[Marathi] आज पुणे, नागपूर, अकोला, औरंगाबाद आणि रत्नागिरीत पावसाची शक्यता

December 26, 2019 3:28 PM|

weather in Maharashtra

स्कायमेटने आधीच वर्तविल्यानुसारमहाराष्ट्रातबर्‍याच भागात विशेषत: नागपूर, अकोला, नाशिक, पुणे आणि मुंबई शहरांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडला आहे.

अजूनही वाऱ्यांचे संगम क्षेत्र महाराष्ट्रावर कायम आहे. तसेच ईशान्य अरबी समुद्रापासून महाराष्ट्राच्या उत्तर किनाऱ्यापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा विस्तारलेला आहे. त्यामुळे आज देखील महाराष्ट्रातील बर्‍याच भागात पावसाची अपेक्षा आहे.

आता, मराठवाड्याच्या काही भागांसह मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि गोवा तसेच विदर्भात पावसाळी गतिविधींचा जोर वाढेल. तथापि, उत्तर मध्य महाराष्ट्रात केवळ तुरळक सरी किंवा ढगाळ वातावरण राहण्याची अपेक्षा आहे.

सांगली, सातारा, सिंधुदुर्ग,पुणे आणि औरंगाबाद,नागपूर, अकोला, अमरावती, लातूर, बीड, रत्नागिरी, उस्मानाबाद या शहरांमध्ये विखुरलेला पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जळगावचे हवामान बहुतांशी कोरडेच राहील. मुंबईत देखील गडगडाटासह तुरळक हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही.

उद्या मात्र पावसाळी गतिविधींमध्ये लक्षणीय प्रमाणात घट होईल, आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या पूर्वेकडील भागात केवळ तुरळक सरींची शक्यता आहे. येत्या २८ डिसेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळी गतिविधी पूर्णपणे कमी होतील आणि आभाळ स्वच्छ होईल.

अशा प्रकारे वायव्येकडून वारे येण्यास सुरूवात झाल्यामुळे किमान तापमानात हळूहळू घट होणे अपेक्षित आहे. कालही मुंबईच्या बर्‍याच भागात धुरके अनुभवण्यात आले. वातावरणातील वरच्या थरात ईशान्येकडील थंड वारे असून त्या खाली दक्षिणपश्चिमेकडील आर्द्र वारे आहेत. अशाप्रकारे, या विरुद्ध वाऱ्यांच्या मिश्रणामुळे हलके धुके तयार होते.

Image Credits – Newsmobile 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

Similar Articles