Skymet weather

[Marathi] व्यवस्थापकीय संचालक स्कायमेट, जतिन सिंग: पुढील एक आठवडा मान्सून देशात सक्रिय राहणार, मध्य भारतात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. येत्या २ ऑगस्टपर्यंत तरी मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता नाही

July 29, 2019 4:17 PM |

Monsoon in India

स्कायमेटच्या अंदाजाप्रमाणे मान्सूनने मागील आठवड्यात चांगले प्रदर्शन केले. पूर्व, मध्य आणि वायव्य भारतातील काही भागात पावसाची चांगली नोंद झाली. केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीवरही मुसळधार पावसाची नोंद झाली आणि आर्थिक राजधानी मुंबईला पावसाळ्यातील नेहमीच्या त्रासाचा सामना करावा लागला.

१ जून ते २ जुलै या कालावधीत देशभरात पावसाची कमतरता १८ टक्क्यांवरून १३ टक्क्यांवर घसरली आहे. आतापर्यंत देशात एकूण सरासरी ४२२.१ मिमी पावसाच्या तुलनेत ३६८.९ मिमी पाऊस पडला आहे. फक्त एका आठवड्यात तूट ५ टक्क्यांनी कमी होणे ही एक महत्त्वपूर्ण बाब आहे. मागील आठवड्यात आणि त्यापूर्वीच्या
आठवड्यादरम्यान पावसाची असलेली आकडेवारी खालील तुलनात्मक सारणीत दर्शविली आहे.

Rainfall Deficiency In India

बहुतांश उपविभागातील कमतरता कशी कमी झाली हे या सारणीमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. वायव्य भारतातील पावसाच्या कमतरतेत ९ टक्के इतकी घसरण होऊन पावसाच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा प्रदेश ठरला आहे.

सक्रिय मान्सूनमुळे मुसळधार पाऊस

सक्रिय मान्सूनमुळे या आठवड्यातही जवळपास सारखीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. खरं तर देशभरात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. ओडिसा, छत्तीसगड, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात यासारख्या मध्य भारतातील राज्यांत या काळात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.

पंजाब, हरयाणा, दिल्ली, बिहार आणि उत्तर प्रदेश सारख्या उत्तरपश्चिमी आणि पूर्वेकडील भारतात देखील पाऊस पडेल परंतु जोर मध्यम असेल.

दरम्यान दक्षिण भारतामध्ये मात्र हवामान विषयक गतिविधी कमी होतील. हवामान प्रारूपांच्या अनुसार तामिळनाडू आणि केरळसह रायलसीमा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक यासारख्या अति दक्षिणेकडील भागात संपूर्ण आठवड्यात हलका पाऊस पडेल.

एकंदरीत पाहता दक्षिण भारतातील काही भाग वगळता उर्वरित संपूर्ण देशात चांगला पाऊस पडेल असेच म्हणले पहिले. देशभरात असलेली पावसाची कमतरता १३% पेक्षा कमी होण्याची शक्यता असून ११% च्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे.

मुंबईत अत्यंत तीव्र पावसाची शक्यता नाही

विशेषतः मुंबईबद्दल बोलायचे तर शहरात पावसाचे प्रमाण बरेच चांगले आहे. जुलैमध्ये आतापर्यंत मुंबईत मासिक सरासरी ८४१ मिमीच्या तुलनेत तब्बल १३५९ मिमी पाऊस पडला असून गेल्या पाच वर्षातील हा सर्वाधिक पाऊस आहे. दरम्यान, हवामान परिस्थिती अनुकूल दिसत असून मुंबई व उपनगरात पाऊस जोरदार राहणार नसून शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे आम्ही असे म्हणू शकतो की मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता फारच कमी असेल आणि शहरात नेहमीप्रमाणेच लोकांचे जीवन सुरू राहील. याकाळात वाहतुकीची व सखल भागात पाणी साठण्याची कोंडी होण्याची समस्या मुंबईकरांना भेडसावणार नाही.

पिकांवर परिणाम

देशभरात पावसाच्या पार्श्वभूमीवर मान्सूनच्या सक्रियतेत वाढ होणे अनेक भागातील पिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरले आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात झालेल्या पावसामुळे कापूस, सोयाबीन, कडधान्य या पिकांना निश्चितच फायदा होणार आहे.

दक्षिण बिहारमधील पावसामुळे भात पिकाची पेरणी सुकर होईल, तर मान्सूनच्या पावसाचा फटका उत्तर बिहारला सहन करावा लागेल. उत्तर बिहारमधील जवळपास १२ जिल्हे पूरसदृश परिस्थितीशी झुंज देत आहेत. मुसळधार पाऊस पडल्याने या प्रदेशातील अनेक पिके नष्ट होण्याचा धोका आहे म्हणून तेथील लोकांनी सावध राहिले पाहिजे.

उत्तर प्रदेशात झालेला चांगला पाऊस ऊस पिकासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.

कर्नाटक, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशमधील पिकांनाही पाण्याची तीव्र गरज आहे. या प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज असला तरी हलका पाऊस पडण्याची शक्यता मातीतील ओलावा सुधारण्यास मदत करेल, आणि पिकांसाठी फायदेशीर ठरेल.

एकूणच येणारा आठवडा मान्सूनच्या बाबतीत देशभरासाठी चांगल्या पावसाचा आठवडा ठरणार आहे. जून महिना कोरडा गेला तरी जुलै महिन्याचा शेवट सकारात्मक होईल. या कालावधीत देशभरात पावसाची कमतरता देखील चांगल्या प्रमाणात कमी होईल.

प्रतिमा क्रेडीट: इंडिया टूड़े

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try