>  
>  
[Marathi] 24 एप्रिल- मुंबई,पुणे, नाशिक येथे कोरडे हवामान, चंद्रपूर व ब्रम्हपुरीत उष्णतेची लाट

[Marathi] 24 एप्रिल- मुंबई,पुणे, नाशिक येथे कोरडे हवामान, चंद्रपूर व ब्रम्हपुरीत उष्णतेची लाट

09:01 AM


गेल्या चार-पाच दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान कोरडेच आहे, असे असूनही राज्याच्या काही भागांमध्ये तापमानात घट झालेली आहे.

महाराष्ट्रातील तापमान जे मागील काही दिवसांपासून सामान्यपेक्षा अधिक होते सध्या सामान्य तापमानाच्या जवळपास स्थिरावले आहे. तथापि, विदर्भातील काही भाग अजूनही उष्णतेची लाट सदृश्य परिस्थिती अनुभवत आहेत, तसेच तापमान देखील ४४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले जात आहे.

Related Post

दरम्यान, मराठवाडा, कोकण आणि मध्य-महाराष्ट्र विभागातील बहुतेक भागांमध्ये तापमान सामान्य पातळीच्या जवळपास स्थिरावले आहे. बहुतेक भागांमध्ये ते ४० अंशांच्या खाली आहे. तसेच, किमान तापमान देखील सामान्यपेक्षा एक ते तीन अंशांनी कमी आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार सद्य-स्थितीत कोणतीही हवामान प्रणाली कार्यरत नसल्यामुळे राज्यात हवामान प्रामुख्याने कोरडेच राहण्याची अपेक्षा आहे, तसेच कमाल तापमान देखील सामान्य पातळीच्या जवळपास राहतील.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसाठी तापमान अंदाज बघूया:

मुंबई येथे कमाल तापमान ३५ अंश सेल्सियस आणि किमान २४ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये दिवसाचे तापमान ३८ अंश सेल्सियस आणि रात्री २० अंश सेल्सियस नोंदवले जावू शकते

पुणे येथे कमाल ४० अंश सेल्सियस आणि किमान २२ अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे

रत्नागिरीत दिवसाचे तापमान ३४ अंश सेल्सियस आणि रात्रीचे २५ अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे

कोल्हापूरमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सियस, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील

वर्धामध्ये कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस असेल तर किमान २६ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे

मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.Rain in India

अकोला येथे कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस आणि किमान २७ अंश सेल्सियस इतके राहणार आहे.

औरंगाबादमध्ये दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियसच्या आसपास राहील.

जळगावात कमाल तापमान ४३ अंश सेल्सियस असेल तर किमान २४ अंश सेल्सियस अपेक्षित आहे

नागपूर येथे कमाल ४३ अंश सेल्सिअस तर किमान २४ अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.