>  
>  
23 ऑक्टोबर महाराष्ट्राचा हवामान अंदाज: महाराष्ट्रात कोरडे हवामान, बहुतेक भागात तापमान सामान्यांपेक्षा अधिक

23 ऑक्टोबर महाराष्ट्राचा हवामान अंदाज: महाराष्ट्रात कोरडे हवामान, बहुतेक भागात तापमान सामान्यांपेक्षा अधिक

03:44 PM


संपूर्ण महाराष्ट्रात कोरडे हवामान अजूनही चालू आहे. विदर्भातील बहुतेक भागात तापमान सामान्यांपेक्षा अधिक आहे. काही ठिकाणी तर तापमान 38 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलेले आहे.

दरम्यान क्षेत्रामध्ये कोणतीही महत्त्वपूर्ण हवामान प्रणाली दिसत नाही आहे. तथापि, तटीय कर्नाटकच्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात खालच्या पातळीवर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे ज्यामुळे पुरीकडील वारे उत्तर महाराष्ट्रात वाहतील व किनारपट्टीच्या दिशेने उत्तरी वारे अनुभवतील.

दुसरीकडे, दक्षिण वारे मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रवर वर वाहतील.

याशिवाय, दिवसाच्या तापमानात मोठा बदल होणार नाही तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रच्या काही भागात रात्री तापमान कमी होण्याची अपेक्षा आहे.

येत्या काही दिवसांमध्ये आकाशात समुद्री किनाऱ्यावर आकाश ढगाळ होण्याची शक्यता आहे, तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या समुद्र किनारी भागांमध्ये पाऊस पढण्याची शक्यता आहे.

आता महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या तापमानावर नजर टाकूया:

मुंबईत अंशतः ढगाळ आकाशासह कमाल तापमान 35 अंश से. आणि किमान 25 अंश से. असण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये अंशतः ढगाळ आकाशासह कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान 18 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.

मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.Rain in India

पुणे येथे अंशतः ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता असून कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21 अंश राहण्याची अपेक्षा आहे.

वर्धा येथे अंशतः ढगाळ आकाशासह कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 19 अंश सेल्सिअसच्या जवळपास असेल.

अकोला येथे अंशतः ढगाळ आकाशासह दिवसा तापमान 36 अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.

नागपूरमध्ये अंशतः ढगाळ आकाशासह दिवसा तापमान सुमारे 35 अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 19 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.