Skymet weather

हवामान अंदाज 15 जानेवारी: जम्मू-काश्मीर मध्ये पाऊस, महाराष्ट्रात हवामान कोरडेच

January 14, 2020 4:46 PM |

पूर्व राजस्थान आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्रामध्ये चक्रवाती परिस्थिती आहे. एक कॉन्फ्लुएन्स झोन मध्य प्रदेशवर आहे. म्हणूनच, पश्चिम आणि उत्तर मध्य प्रदेश तसेच राजस्थानमधील बऱ्याच भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यात आहे. उत्तर दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पश्चिम राजस्थान व गुजरातच्या किमान तापमानात १-२ अंशांनी घट होईल. महाराष्ट्र व छत्तीसगडचे हवामान कोरडे राहील.

एक पश्चिमी विक्षोभ उत्तर पाकिस्तान आणि त्याच्या आसपासच्या भागात आहे. त्यामुळे 15 जानेवारी रोजी संध्याकाळी उशिरापर्यंत जम्मू-काश्मीर, लडाखचा काही भाग आणि हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणामधील उत्तरी जिल्ह्यांत एक दोन ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तराखंड, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशचे हवामान कोरडे राहील.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

गंगीय पश्चिम बंगालवर एक विपरीत चक्रवाती परिस्थिती आहे. म्हणूनच पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये हवामान कोरडे राहील. ओडिशा आणि झारखंडच्या किमान तापमानात १-२ अंशांनी वाढ दिसून येईल. तथापि, पूर्व उत्तर प्रदेशात किमान तापमानात किरकोळ घट होऊ शकते. पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारच्या बऱ्याच भागात मध्यम ते दाट धुक्याची शक्यता आहे. ईशान्य भारताचे हवामान कोरडे राहील परंतु पूर्व आसाम आणि अरुणाचल प्रदेशात एक दोन ठिकाणी हलका पाऊस पडेल.

बंगालच्या उपसागरापासून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तामिळनाडू आणि किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशातील किमान तापमानात किरकोळ वाढ होण्याची अपेक्षा आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगाणासह संपूर्ण दक्षिण द्वीपकल्पातील हवामान कोरडे राहील.

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try