Skymet weather

[Marathi] चक्रीवादळ बुलबुल कमकुवत झाले, पश्चिम बंगालमध्ये पावसाचे प्रमाण कमी होईल

November 10, 2019 2:06 PM |

rain in Kolkata

अखेर काल रात्री चक्रवाती बुलबुल पश्चिम बंगालमध्ये धडकले आणि १३५ किमी प्रतितास वेगाच्या वेगाने वारे वाहिले. बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या अनेक भागात मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे दिसू आले.

राज्यात पावसाने जोर धरला आहे. शिवाय, गेल्या २४ तासांत खेपुपारामध्ये १०५ मिमी, भोला मध्ये ९९ मिमी, बेरिसल १३९.५ मिमी, जेसोरमध्ये ५२ मिमी पाऊस पडला. दरम्यान, पश्चिम बंगालमधील कोंटाई येथे तब्बल १६६ मिमी, कोलकातामधील दम दम विमानतळ मध्ये १०३ मिमी, कोलकाता मधील अलिपूर मध्ये ९१.७ मिमी, दिघा मध्ये ९६.६ मिमी, डायमंड हार्बर मध्ये ९१ मिमी पाऊस पडला.

पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही प्रणाली क्षीण होत चालली आहे. हि प्रणाली चक्रीवादळ मध्ये कमकुवत होऊन बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम किनारपट्टीवर अक्षांश २२.२ डिग्री उत्तर आणि रेखांश ८९.५ डिग्री पूर्व, कोलकाता पासून सुमारे १२५ किलोमीटर पूर्व-दक्षिण पूर्व आणि खेपुपरा पासून ८० किलोमोटर स्थित आहे.

वादळाभोवती सध्याचा वाऱ्यांचा वेग ८०-९० किमी प्रतितास ते १०० किमी प्रतितास आहे. चक्रीवादळ १५ किमी प्रति तासांच्या वेगाने पूर्वेकडील ईशान्य दिशेने सरकले आहे आणि बांगलादेशला ओलांडून पुढील काही तासांत डीप डिप्रेशन मध्ये कमकुवत होणार आहे आणि त्यानंतर लवकरच डिप्रेशन मध्ये आणखी कमकुवत होऊन जाईल.

आता हे सांगणे सुरक्षित आहे की वादळाने पश्चिम बंगलाचा मार्ग स्पष्ट केला आहे, म्हणजेच पावसाचे प्रमाण कमी होईल आणि हवामान लवकरच स्वच्छ होईल. काही तासांकरिता उत्तर आणि २४ दक्षिण परगनांवर काही प्रमाणात किरकोळ परिणाम होऊ शकतात. दरम्यान, आता पाऊस इशान्य भारत, मिझोरम, त्रिपुरा, आसामच्या दक्षिण भागात होईल.

Image Credits – India TV

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try