Skymet weather

[Marathi] पश्चिम किनारपट्टीला चांगला पाऊस सुरु राहणार

September 16, 2015 2:51 PM |

Bangalore rainपश्चिम किनारपट्टीला असलेले गोवा, कर्नाटकाची किनारपट्टी आणि केरळ हे तिन्ही भाग सर्वात जास्त पाऊस होणारे आहेत. तसेच यंदाचा नैऋत्य मान्सून मात्र या भागांसाठी फारसा चांगला नाही ठरला आणि त्यामुळेच या भागातील पावसाची कमतरतेची पातळी वाढलेली आहे.

भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागाकडे असलेल्या माहितीनुसार या क्षणाला कोकण आणि गोव्याच्या उपभागात ३३% पावसाची कमतरता आहे. तसेच केरळ आणि कर्नाटकाची किनारपट्टी येथे अनुक्रमे २९% आणि २७% पावसाची कमतरता आहे. या भागातील पावसाची सरासरी बघता ती खूपच जास्त आहे आणि थोडा जरी कमी पाऊस झाला तरी या भागाची पावसाची कमतरतेची पातळी वाढू शकते.

यंदाच्या मान्सून काळात कर्नाटकाच्या किनारपट्टीला २००० मिमी, कोकण आणि गोवा येथे १८०० मिमी आणि केरळ येथे १४०० मिमी तरीही या भागात पावसाची कमतरता निर्माण झाली आहे.

सध्या या भागावर वरुण देवता प्रसन्न झालेली दिसते कारण या भागात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. कोकण आणि गोव्यात तसेच कर्नाटकच्या किनारपट्टीला चांगला पाऊस होतो आहे. केरळमध्ये मध्यम पाऊस सुरु आहे.

मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत कोकणातील रत्नागिरी येथे १०७ मिमी पावसाची नोंद झाली. एला या गोव्यातील भागात १२० मिमी तसेच कर्नाटकातील कारवार आणि होनावर येथे अनुक्रमे १०७ मिमी आणि ६६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. केरळातील कुडलु येथे ५१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

बंगालच्या उपसागरात आणि ओडीशाची किनारपट्टी, आंध्रप्रदेश आणि लगतच्या छत्तीसगड या भागांवर चांगल्या क्षमतेचा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे आणि त्यामुळे किनारपट्टी लगतच्या भागावर असलेल्या कमी दाबाचा पट्टा प्रभावी करण्यास मदत होते आहे. आणि त्यामुळे पश्चिम किनारपट्टीला चांगला पाऊस सुरु आहे.

हि हवामान प्रणाली अशीच अजून काही काळ प्रभावी राहील आणि पश्चिम किनारपट्टीच्या जमिनीकडे सरकेल आणि त्यामुळेच या भागात येते ३ ते ४ दिवस जोरदार पाऊस सुरु राहील.

 

Image Credit: indiatvnews.comFor accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories


latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try

×