Skymet weather

[Marathi] पुण्यात मुसळधार पावसाने ५ लोकांचा बळी, शाळा कॉलेज बंद, अजून पावसाची शक्यता

September 26, 2019 11:10 AM |

Rain in Pune

मागील दोन ते तीन दिवसांपासून गडगडाटासह मुसळधार पावसाने पुणे शहरात धुमाकूळ घातला आहे. स्कायमेटच्या हवामान केंद्रांच्या आकडेवारीनुसार, आज पहाटे साडेपाच वाजेपर्यंत फक्त २१ तासांच्या कालावधीत शहरात ९० मिमी इतका जोरदार पाऊस पडला आहे.

बुधवारी शहरातील अनेक भागांत मुसळधार पावसाने कहर केला असून शहरातील सहकारनगर, पर्वती या भागातील प्रमुख भागांना पाण्याचा तडाखा सहन करावा लागला. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत दोन महिला आणि एका मुलासह सुमारे ५ जणांचा बळी गेला आहे. मुसळधार पावसामुळे कात्रज कालव्याची भिंत कोसळल्याने बऱ्याच प्राण्यांना आपले प्राण गमावेवे लागले आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सहकारनगर परिसरातील अनेक घरे आणि वाहने वाहून गेली.

या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुण्याच्या जिल्हाधिका्यांनी आज सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टीचे आदेश दिले आहेत.

स्कायमेटच्या हवामानशास्त्रज्ञांच्या अनुसार पुणे शहरात अजून पाऊस पडण्याची शक्यता आहे, परंतु आता जोर तुलनेने कमी असेल. शहर व आसपासच्या भागात आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येण्याची अपेक्षा आहे, तथापि, आज आणि उद्या देखील योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे.

तसेच, २८ सप्टेंबर पासून शहरात पावसाळी गतिविधींचा जोर कमी होईल आणि सध्याच्या पूरसदृश परिस्थितीतून दिलासा मिळणार आहे.

Image Credits – The Hindu

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try