Skymet weather

[Marathi] माथेरान आणि अलिबागमध्ये मुसळधार अवघ्या २४ तासात ४०० मिमी पेक्षा जास्त पाऊस, आणखी पावसाची शक्यता

August 4, 2019 2:06 PM |

Maharashtra rains

मागील काही दिवसांपासून मान्सून महाराष्ट्रात सक्रिय असून गेल्या २४ तासांत कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच मध्य-महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस झाला आहे. दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

स्कायमेटकडील उपलब्ध असलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार, जोरदार मान्सूनमुळे केवळ २४ तासांच्या कालावधीत माथेरानमध्ये ४४० मिमी पाऊस झाला आहे. तसेच मागील २४ तासांत अलिबागमध्ये ४११ मिमी, ठाणे येथे ३४२ मिमी, महाबळेश्वर ३०६ मिमी, रत्नागिरी १५४ मिमी, नाशिक ९९ मिमी, वेंगुर्ला ९३ मिमी, जळगाव ५२ मिमी, कोल्हापूर ५१ मिमी, सातारा येथे ४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

आता सक्रिय मान्सूनची जोरदार लाट व दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीपर्यंत विस्तारलेला कमी दाबाचा पट्टा यांच्या एकत्रित प्रभावामुळे येत्या १८ ते २४ तासांकरिता कोकण किनारपट्टीवर सक्रिय मान्सूनची परिस्थिती कायम राहील.

दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्यामुळे २४ तासांनंतर विदर्भात पावसाळी गतिविधींत वाढ होईल. ही प्रणाली देशाच्या मध्यवर्ती भागातून प्रवास करणार असून, त्यामुळे विदर्भाच्या काही भागात एक दोन मुसळधार सरींसह मध्यम पाऊस पडेल. पुढील तीन ते चार दिवस या गतिविधी सुरु राहण्याची शक्यता आहे. याकाळात, कोकण किनारपट्टी, मध्य-महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस कमी होईल.

पुढील २४ तासांत मुंबई, ठाणे, पुणे, सांताक्रूझ, रत्नागिरी, हर्णे, कुलाबा, डहाणू इत्यादी ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, तर नागपूर, चंद्रपूर, बीड, लातूर, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तर, औरंगाबाद व नाशिक येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. दरम्यान मुसळधार पावसामुळे पश्चिम किनारपट्टीवरील काही भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकेल. तसेच महाराष्ट्रातील डोंगराळ भागात भूस्खलन होण्याची शक्यता आहे.

३ ऑगस्टपर्यंत मध्य-महाराष्ट्रात पावसाचे ४१% इतके आधिक्य आहे, तर मराठवाड्यात अजूनही पावसाची कमतरता असून तूट १९% आहे. विदर्भातील पावसाची कमतरतेत सुधारणा असून सध्या फक्त ३% तूट आहे. या होणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोकण आणि गोव्यातील पावसाच्या आधिक्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

प्रतिमा क्रेडीट: The Statesman

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try