Skymet weather

[Marathi] मुंबई पाऊस २०१९ लाईव अपडेट्स: आज कमी तीव्रतेसह मुंबईत पाऊस सुरु राहील, उद्या हवामान कोरडे होईल

August 15, 2019 10:14 AM |

Mumbai Rains

Updated on August 15, 10: 13 AM: आज कमी तीव्रतेसह मुंबईत पाऊस सुरु राहील, उद्या हवामान कोरडे होईल

गेल्या २४ तासांत मुंबईत पावसाचा जोर कमी राहिला. आता शहरभरात पावसाच्या गतिविधींमध्ये जास्त वाढ अपेक्षित नाही आहे. आज एक-दोन तुरळक सरींची शक्यता आहे, परंतु शहरात उद्यापासून पुन्हा एकदा हवामान कोरडे होईल.

Updated on August 14, 01: 32 PM: मुंबईत पाऊस आज काही वेग पकडेल

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर कमीच राहिलेला आहे. गेल्या २४ तासांतही हलका पाऊस पडला आहे. सांताक्रूझ येथे ०.३. मिमी तर कुलाबा येथे २.४ मिमी पाऊस पडला आहे.

आज पाऊस काही वेग पकडेल आणि येत्या २४ तासांत एक किंवा दोन मध्यम सरींची शक्यता आहे. अशीच परिस्थिती उद्याही होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हवामानातील क्रिया कमी होईल. तथापि, अधून मधून हलका पाऊस सुरु राहील.

Updated on August 12, 01: 32 PM: मुंबईत पाऊस परत वाढेल

गेल्या २४ तासांत मुंबईत हलका पाऊस पडला आहे. सांताक्रूझ येथे ५.६ मिमी तर कुलाबा येथे ०.४ मिमी.पावसाची नोंद झाली आहे.

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे १४ ऑगस्टच्या सुमारास पुन्हा एकदा मुंबईत पाऊस वाढेल व मान्सूनची लाट सक्रिय होईल. या कालावधीत शहरात एक किंवा दोन जोरदार गडगडाटीसह मध्यम पाऊस पडेल.

Updated on August 11, 04: 16 PM:  मुंबईत हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित 

गेल्या २४ तासांत मुंबई व उपनगरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली आहे. कुलाबात १ मिमी, सांताक्रूझ येथे ०.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

किनारपट्टीवर ट्रफ रेषा अजूनही कायम आहे, ज्यामुळे आज मुंबईत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.  अधून मधून हा पाऊस सुरु राहील.

Updated on August 10, 10: 27 AM: मुंबईत हलका पाऊस सुरु राहील 

मुंबईत हलका पाऊस पडला आहे. मुंबई, उत्तर कोकण आणि गोवा येथे पुढील काही दिवस विखुरलेला पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे. गेल्या २४ तासांत, कुलाबा मध्ये ७.२ मिलीमीटर पाऊस तर सांता क्रूझ मध्ये केवळ ०.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. येणाऱ्या दिवसांतही मुंबईत पावसाचा जोर कमीच राहणे अपेक्षित आहे व येथे हलका पाऊस सुरु राहील, असे दिसून येत आहे.

Updated on August 9, 01: 08 PM: मुंबईत अधून मधून पाऊस सुरु राहील

पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनची लाट आता कमजोर होत आहे, त्यामुळे मुंबईत पाऊस कमी होईल. हवामान ढगाळ राहील परंतु येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाची आम्हाला अपेक्षा नाही. तथापि, अधून मधून हलका पाऊस सुरु राहील व एक किंवा दोन जोरदार सरींची देखील शक्यता आहे. शिवाय, हवामान किंचित आरामदायक राहील.

Updated on August 8, 02: 30 PM: रात्रीपर्यंत मुंबईत पाऊस वाढणार

आज देखील दिवसभर, मुंबई आणि उपनगरामध्ये फारशा पावसाची शक्यता नाही. मात्र, आज रात्रीपर्यंत पावसाळी गतिविधीत पुन्हा वाढ दिसेल. त्याचे कारण छत्तीसगड आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशातील कमी दाबाचा पट्टा होय.

ही प्रणाली पश्चिम दिशेने सरकत असल्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तर-किनारपट्टीसह पश्चिम किनारपट्टीवर मान्सून ची लाट तीव्र होईल.

म्हणून,आज रात्री मुंबई आणि उपनगरात काही जोरदार सरींसह मध्यम पावसाची शक्यता आहे. या पावसाळी गतिविधी उद्यापर्यंत सुरू राहतील.

Updated on August 6, 09: 53 AM: मुंबईत पावसाचा जोर कमीच राहणार 

मुंबईत पावसाचा जोर कमी असून शहरात आता एकच अंकी पावसाची नोंद झाली आहे. स्कायमेटने यापूर्वीही उल्लेख केल्याप्रमाणे, मुंबईत पाऊस कमी झाला आहे आणि पुढील २ ते ३ दिवसांतही अशीच परिस्थिती दिसून येईल.

वस्तुतः सोमवारी सकाळी ८:३० वाजेपासून गेल्या २४ तासांत सांताक्रूझमध्ये अवघ्या ९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

त्यामुळे सध्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळू शकेल कारण मुंबईत पावसाचा जोर सध्या कमीच राहणार आहे.

Updated on August 5, 10:10 AM:  मुंबईत मुसळधार पावसाची आता शक्यता कमी, पावसाचा जोर कमी होण्याची अपेक्षा 

मुंबईत पावसाचा जोर कमी झाला आहे आणि मुसळधार पाऊस नसल्यामुळे शहरात दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवाय, मुंबई शहरासाठी येत्या काही दिवस पावसाचा जोर कमीच राहील.

खरं तर, मुंबईच्या पावसात आता लक्षणीय प्रमाणात घट दिसून येईल आणि पुढील काही दिवस तरी मुसळधार पाऊस परतण्याची शक्यता नाही आहे.

Updated on August 4, 11:00 AM:  पश्चिम रेल्वेने अशी माहिती दिली की वसई ते विरार रेल्वे स्थानकांदरम्यान पाणी साचल्याने आणि बिलीमोरा ते नवसारी दरम्यान रेल्वे पुलावर धोक्याच्या पातळीच्या वरती पाणी वाहून गेल्याने अनेक गाड्या रद्द केल्या जातात आहे. बीडीटीएसकडून निर्धारित वेळेपेक्षा दोन तास उशिराने सुटण्यास 12471 स्वराज एक्सप्रेसचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. शिवाय, 19015  सौराष्ट्र एक्स्प्रेस रद्द झाली आहे.

मुसळधार आणि सतत पाऊस पडल्याने आणि काही विभागात पाणी साचल्यामुळे पुढील प्रवाशांना त्रास होऊ नये उपाय म्हणून मध्य रेल्वे उपनगरी विभागातील मध्यवर्ती मुख्यलाईन आणि हार्बर मार्गावर सकाळी 8 वाजता सेवा थांबविण्यात आल्या आहेत.

त्यात असेही म्हटले आहे की दर तासाला परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि त्यानुसार अद्ययावत केले जाईल. मध्य रेल्वेने ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा आणि खारकोपर ते चौथा कॉरिडोर सामान्यपणे सुरू असल्याची माहिती दिली.

Updated on August 4, 09:22 AM: मुंबईत आज मुसळधार पाऊस सुरु राहणार, मुंबईकरांना घरातच रहाण्याचा सल्ला

कालपासून मुंबईत पाऊस थांबला नाही आहे आणि मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे कारण सध्या अनेक भागात पाणी साचले आहे. आता, आम्ही अपेक्षा करतो की आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहील. दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे पाणी साचण्याची समस्या दिसून येणार आहे आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. वाहतुकीची कोंडी नाकारता येत नाही. काही रेल्वे गाड्या मध्य रेल्वेने यापूर्वीच संपुष्टात आणल्या आहेत किंवा रद्द केल्या आहेत.

सुदैवाने, आज रविवार आहे आणि मुसळधार पाऊस सुरूच आहे, हे पाहता मुंबईकरांना घरातच रहाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Updated on August 3, 03:16 PM: २४ तासांत सांताक्रूझने १३४ मिमी पावसाची नोंद केली, मुसळधार पाऊस सुरु राहणे अपेक्षित 

गेल्या २४ तासांत सांताक्रूझमध्ये १३४ मिमी इतका मुसळधार पाऊस पडला आहे. त्याच वेळी कुलाबा येथे ५४ मिमी पाऊस झाला आहे.  मुसळधार पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचले आहे.
आता मुंबईतील बहुतांश भागांत मुसळधार पाऊस कायम राहण्याची आहे. खरं तर, तीन अंकी पाऊस आज आणि उद्या देखील दिसू शकतो. पाणी साचणे, उड्डाण विलंब आणि वाहतूक कोंडीची समस्या दिसून येईल.

Updated on August 2, 03:13 PM: मुंबईत तीन अंकी पाऊस पडण्याच्या अंदाज

मुंबईकरांची आज सकाळची सुरुवातच ढगाळ वातावरणाने झाली असून लगेच पावसाला सुरुवात झाली. तेव्हापासून शहरात पाऊस सुरूच असून संपूर्ण दिवसभर पाऊस सुरु राहण्याची शक्यता आहे. सकाळी ८:३० ते ११:३० या तीन तासांतच सांताक्रूझमध्ये ३० मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान मुंबईत आता पावसाळी गतिविधीत वाढ होण्याची शक्यता आहे आणि बऱ्याच ठिकाणी तीन अंकी पावसाची नोंद होऊ शकते. शिवाय, उद्या आणि परवा पावसाची तीव्रता जास्त असेल आणि बऱ्याच भागांत पाणी साचण्याची तसेच वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू शकते.

Updated on August 1, 12:15 PM: मुंबईत ४ ऑगस्टपर्येंत गडगडाटी वादळासह पाऊस सुरू राहील

मुंबई मध्ये गेल्या २४ तासांत, मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. कुलाबा मध्ये ९.२ मिलीमीटर आणि सांता क्रूझ मध्ये १३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आता, मुंबईत सध्यातरी मुसळधार पाऊस पडण्याची अपेक्षा नाही आहे. तथापि, शहर आणि उपनगरात ४ ऑगस्टपर्येंत गडगडाटी वादळासह पाऊस सुरू राहील. पुढे, ५ ऑगस्टनंतर हवामान जवळ-जवळ कोरडे होईल, अशी आमची अपेक्षा आहे.

Updated on July 30, 10:38 AM: थोडा ब्रेक घेत मुंबईत पाऊस सुरु राहील 

गेल्या २४ तासांत, मुंबई मध्ये जोरदार पाऊस पडला आणि सांताक्रूझ वेधशाळेने काल आणि आज पहाटे ८:३० वाजता च्या दरम्यान ३९ मि.मी. पावसाची नोंद केली.

सध्या शहरभर ढगाळ वातावरण आहे आणि काही भागात पाऊस देखील सुरु आहे.

स्कायमेट हवामानानुसार, मुंबईत पाऊस आजही सुरूच राहणार परंतु हलका व मध्यम दरम्यान राहील. हा पाऊस निसर्गाच्या दृष्टीने जोरदार ठरणार नाही आणि हादेखील दीर्घकाळ राहणार नाही. असे म्हणता येईल कि आज मुंबईत अधून मधून, विश्रांतीसह पाऊस सुरु राहील.

Updated on July 29, 11:40 AM: मुंबई मध्ये एक किंवा दोन मध्यम किंवा तीव्र सरींची शक्यता 

मुंबईत गेल्या २४ तासांत पावसाचा जोर कमी झालेला असून कुलाबा मध्ये फक्त ६.२ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. याउलट, सांता क्रूझ मध्ये ०.३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. मुंबई मध्ये येत्या दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नाही आहे, परंतु एक किंवा दोन मध्यम किंवा तीव्र सरींची शक्यता नाकारता येत नाही.

Updated on July 28, 10:57 AM: येणाऱ्या २४ तासांत मुंबईत पावसाची तीव्रता कमी होईल, २९ जुलै पासून वेग वाढणार 

गेल्या २४ तासांत सांताक्रूझ वेधशाळेमध्ये केवळ २८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, कुलाबात ४४.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मान्सूनची लाट कमी झाली असल्याने, मुंबई शहरात किंचित कमी तीव्रतेसह पाऊस सुरूच राहील. दरम्यान, उपनगरामध्ये गडगडाटीसह पाऊस चालू राहील.

आज आम्ही शहर व उपनगरामध्ये एक किंवा दोन जोरदार सरींसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची अपेक्षा करतो.

उद्यापर्यंत पुन्हा एकदा तीव्रता वाढेल आणि मुंबई व आसपासच्या भागात जोरदार पाऊस अनुभवण्यात येईल.

Updated on July 27, 10:00 AM: मुंबईत १९२ मिलीमीटर पाऊस, जोरदार पाऊस सुरु राहणे अपेक्षित

गेल्या १५-१८ तासांत मुंबई शहराने जोरदार पाऊस पाहिले आहे . शहरातील अनेक ठिकाणी फ्लाइट डायव्हर्शन, जलकुंभ, भागात विलंब व स्थगित मुंबई लोकल व मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. शिवाय रात्रीच्या वेळी मुसळधार पाऊस झाला आहे. पावसाच्या आकडेवारीबद्दल बोलतांना, काल सकाळी ८:३० ते आज सकाळी ८:३० दरम्यान गेल्या २४ तासांच्या कालावधीत सांताक्रूझ वेधशाळेमध्ये २१ मिमी पावसाची नोंद झाली. शिवाय, गेल्या १२ तासांत शहरात १६९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. मुंबईत सकाळपासूनच थोड्या थोड्या विश्रांतीसह, मुसळधार पाऊस सुरु आहे.

Updated on July 27, 8:30 AM: मुंबईत आजही पाऊस सुरु राहणे अपेक्षित

गेल्या १२-१५ तासांत मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. रात्री उशिरा मुसळधार पाऊस पडला असून सांताक्रूझ वेधशाळेमध्ये आज पहाटे २:३० ते ५:३० दरम्यान ५० मिमी पेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला आहे. आजही मुंबईतील बर्याच भागात जोरदार पाऊस पडणे अपेक्षित आहे.

Updated on July 27, 7:00 AM: काही तासांतच १३२ मिमी पावसासह, मुंबईत १७ उड्डाणे वळविले.

मुंबई शहरामध्ये जोरदार पाऊस झाला आहे . शिवाय, गेल्या १२ तासांत सांताक्रूझ येथे १३२ मिमी पाऊस झाला त्यापैकी संध्याकाळी ५:३० ते ११:३० पर्यंत फक्त ६ तासांत १२४ मिमी नोंद झाली. मुंबईच्या इतर भागातही तीन-अंकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या मुसळधार पावसामुळे शहरांत वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे १७ उड्डाणे वळविण्यात आली असून अनेक भागात वॉटर-लॉगगिंगची परिस्थिती दिसून आली आहे.

Updated on July 26, 11:48 AM : मुंबईत पुढील २४ तासांत मध्यम पावसासह एक दोन तीव्र सरींची शक्यता 

गेल्या २४ तासांत मुंबईत पाऊस कमी तीव्रतेने झाला आहे. सांता क्रूझ मध्ये ४४ मिलीमीटर पाऊस व कोलाबा मध्ये १९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तथापि, पुढील २४ तासांत मध्यम पावसासह एक दोन ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. त्यानंतर तीव्रता कमी होईल आणि हलका पाऊस सुरु राहील. एक दोन मध्यम सरींची शक्यात नाकारता येणार नाही.

Updated on July 25, 01:00 PM : मुंबईत आज पावसाचा जोर किंचित कमी राहण्याची अपेक्षा 

गेल्या २४ तासांत, मुंबई मध्ये जोरदार पाऊस झाला आहे. कारण आहे एक चक्रवाती परिस्थिती जी सध्या दक्षिण गुजरातवर बनलेली आहे. गेल्या २४ तासांत, कोलाबा मध्ये ५२ मिलीमीटर आणि सांता क्रूझ मध्ये ३८ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तथापि, येणाऱ्या २४ तासांत, पावसाचा जोर किंचित कमी राहण्याची अपेक्षा आहे.

त्यानंतर २७ जुलैच्या आसपास पावसाचा जोर परत वाढेल आणि या कालावधीत, आम्ही बर्याच ठिकाणी जोरदार पावसाची अपेक्षा करतो. जोरदार पावसामुळे बर्याच ठिकाणी वॉटर-लॉगिंग आणि ट्रॅफिक जाम होईल. मुंबई लोकल मध्ये विलंब होणे अपेक्षित आहे. म्हणूनच मुंबईकरांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे सल्ला देण्यात येत आहे.

Updated on July 24, 12:00 PM : कोलाबा, नवी मुंबईमध्ये पाऊस कमी होईल, पुढील काही तासांत वसई सांताक्रूजवर चालू राहील

पुढच्या २-३ तासांत कोलाबा, नवी मुंबई, पनवेल आणि ठाणे येथे पावसाची तीव्रता कमी होईल आणि पुढच्या १-२ तासांत सांता क्रूझ, भिवंडी आणि वसई मध्ये चांगला पाऊस सुरु राहील.

Updated on July 24, 11:37 AM : कोलाबामध्ये १७४ मिमी पाऊस 

मुंबई शहरामध्ये जोरदार पाऊस पडला आहे. याशिवाय, कोलाबामध्ये १७४ मिमी इतका जोरदार पाऊस नोंदला गेला आहे जो हंगामातील सर्वाधिक आहे.

दरम्यान, सांता क्रूझने गेल्या ९ तासांत ८४ मिमी पावसाचे निरीक्षण केले, त्यातील शेवटच्या ६ तासांत पाऊस ७६ मिमी इतका होता.

Updated on July 24, 11:27 AM : आज नवी मुंबईतील पाऊस आकडेवारी (स्कायमेट एडब्ल्यूएस डेटा)

Mumbai rain data

Updated on July 24, 11:24 AM : स्कायमेट एडब्ल्यूएस मुंबई पाऊस डेटा 

मुंबईत जोरदार पाऊस सुरु झाला आहे आणि काही भागांनी तीन अंकी पाऊसही पाहिला आहे.

Mumbai-Rain-Data

Updated on July 24, 11:18 AM : मुंबईत मुसळधार पाऊस परत सुरु 

मुंबईत आजही पाऊस पडणार असून पावसाचे प्रमाण तीव्र स्वरूपाचे असणार आहे. पुढील पाच ते सहा तासांत शहरात पावसाच्या काही तीव्र सरींची शक्यता आहे.मुसळधार पावसामुळे बऱ्याच भागांत पाणी साचण्याची तसेच वाहतूक कोंडीची समस्या देखील उद्भवू शकते त्यामुळे कार्यालयीन कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

Updated on July 23, 12:17 PM : मुंबईत पाऊस वाढणार

मुंबईसह कोंकणातील उत्तर जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस झाला आहे. कोलाबा (मुंबई) मध्ये ४ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार मुंबईसह कोंकण व गोव्यात पावसाचा जोर आता वाढणे अपेक्षित आहे आणि आज संध्याकाळी मुंबई आणि आसपासच्या भागात काही ठिकाणी चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. पावसाची तीव्रता आणखी वाढेल व २५ जुलै रोजी शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो.

Updated on July 22, 01:17 PM: मुंबईत जोरदार पाऊस परतणार 

रविवारी सकाळी ८:३० वाजता पासून शेवटच्या २४ तासांत सांता क्रूझमध्ये १६ मिमी पाऊस झाला व कोलाबामध्ये पाऊस नोंदला नाही. स्कायमेटच्या अंदाजानुसार, मुंबई मध्ये पाऊस २५ जुलै पासून वाढू शकतो ज्यात काही ठिकाणी मध्यम पाऊस अपेक्षित आहे, जे २६ जुलैला आणखी वाढेल. २७ आणि २८ जुलै रोजी जोरदार पाऊस पडेल आणि तीन-अंकी पाऊस दिसून येईल. वॉटर लॉगिंग आणि ट्रेफिक जामची परिस्थितीही दिसून येईल.

Updated on July 21, 10:12 AM : २५ जुलै रोजी मुंबईत पाऊस वाढणार 

२५ जुलै रोजी मुंबई शहरावर मान्सूनचा प्रभाव वाढेल. खरं तर, २५ जुलै रोजी सुमारे ३०-४० मि.मी. पाऊस होण्याची शक्यता आहे आणि २६ जुलैला १०० मि.मी. पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे पाऊस २५ जुलैला पाऊस वाढू शकतो, जे २६ जुलैला अधिक तीव्रतेने पडेल. २४ जुलैपर्येंत हलका ते मध्यम पाऊस सुरु राहील, म्हणजे सुमारे १५-२० मिमी पावसाची नोंद करण्यात येईल.

Updated on July 19, 10:12 AM : मुंबईत २३ जुलै रोजी पावसाचा जोर परत वाढण्याची अपेक्षा

गेल्या २४ तासांत, मुंबईसह उत्तर कोंकण व गोव्यात मान्सूनचा प्रभाव कमीच राहिलेला आहे. सांता क्रूझ मध्ये २ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या, मुंबई पावसाचा जोर कमीच राहणे अपेक्षित आहे व २२ जुलै पर्येंत येथे काही हलका पाऊस पडणे अपेक्षित आहे. पुढे, २३ जुलै रोजी, मान्सून मुंबईसह उत्तर कोंकण व गोव्यावर पुन्हा एकदा सक्रिय होईल, आणि मुंबईत पावसाचा जोर परत वाढेल. या कालावधीत, मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी जोरदार पावसाची देखील शक्यता आहे. पाऊस २६ जुलै पर्येंत कायम राहील.

Updated on July 18, 12:36 PM : मुंबई मध्ये पावसाचा जोर कमी राहणार 

मुंबईत पावसाचा जोर कमी राहणार असून मुसळधार पावसाची शक्यता नसून पुढील चार ते पाच दिवस शहरात कोणतीही तीव्र पावसाळी गतिविधी दिसणार नाही.तथापि, २२ आणि २३ जुलैच्या सुमारास पावसाळी गतिविधी वाढणार असून त्या वेळेस मुंबई मध्ये पाऊस पुन्हा जोर धरेल.

Updated on July 16, 05:06 PM :  मुंबई मध्ये २२ जुलै पर्येंत हलक्या पावसाची शक्यता 

गेल्या २४ तासांत, मुंबई मध्ये हलका पाऊस झाला आहे. सांता क्रूझ आणि कोलाबा मध्ये ३ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. सध्या, पश्चिम दिशेने येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला आहे ज्यामुळे २२ जुलै पर्येंत मुंबईत हलक्या पावसाची शक्यता आहे. एक दोन ठिकाणी मध्यम सरींची शक्यता नाकारता येणार नाही. याशिवाय, तापमानात वाढ दिसून येईल आणि उष्णता देखील जास्त राहील.

Updated on July 15, 05:06 PM :  मुंबई मध्ये जोरदार पावसाची शक्यता नाही

गेल्या २४ तासांत, मुंबईत हलक्या पावसाची नोंद झाली आहे. कोलाबा आणि सांता क्रूझ मध्ये ३ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. आता, येणाऱ्या एक आठवड्यात मुंबई आणि आसपासच्या भागात जोरदार पावसाची शक्यता नाही आहे व हलका पाऊसच सुरु राहणे अपेक्षित आहे. एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची देखील शक्यता आहे. तापमानात किंचित वाढ दिसून येईल.

Updated on July 14, 12:40 PM : मुंबई मध्ये पाऊस सुरु राहील

गेल्या २४ तासांत, मुंबई मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. कोलाबा मध्ये १६ मिलीमीटर आणि सांता क्रूझ मध्ये ११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

येणाऱ्या २४ तासांत, मुंबई आणि आसपासच्या भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

शहरातील उत्तर भागात हलक्या पावसाची शक्यता आहे, तर दक्षिण मुंबई मध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

होणाऱ्या पावसाचे कारण आहे एक चक्रवाती परिस्थिती जी सध्या उत्तर पूर्व अरबी समुद्र आणि त्याच्या आसपास बनलेली आहे.

येणाऱ्या दोन ते तीन दिवस असाच पाऊस सुरु राहील. शहरातील दक्षिण भागांवर एक दोन ठिकाणी जोरदार सरींची देखील शक्यता आहे.

Updated on July 13, 05:02 PM : मुंबई मध्ये हलका ते मध्यम पाऊस सुरूच

मुंबई मध्ये गेल्या २४ तासांत, पाऊस कमी झालेला आहे. येथे हलक्या ते मध्यम पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

सध्या, एक ट्रफ रेषा दक्षिण महाराष्ट्राच्या किनारीभागांपासून उत्तर केरळ पर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे मुंबई आणि आसपासच्या भागात येणाऱ्या २४ ते ४८ तासांत, हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

या हवामान क्रियाकलापांसोबत मध्यम ते सौम्य वारा वाहील. शिवाय, लाटा उंच होतील आणि 10 फुटांपर्यंत पोहोचू शकतात.

Updated on July 12, 04:48 PM : मुंबई मध्ये पाऊस कमी होईल 

मुंबई मध्ये गेल्या २४ तासांत, पावसाचा जोर कमी झालेला आहे. सांता क्रूझ मध्ये २५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

आता मुंबईत पाऊस कमी होईल व हलका पाऊसच अपेक्षित आहे. तथापि, एक दोन ठिकाणी जोरदार सरींची शक्यता नाकारता येणार नाही.

Updated on July 11, 01:49 PM : मुंबईत पावसाची तीव्रता सौम्य, रहिवाशांना प्रवास करणे सोपे होईल

मुंबईकरांसाठी चांगली बातमी म्हणजे आता मुंबईत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. कारण, उपस्थित मान्सून ट्रफ रेषा आता हिमालयाच्या तळहाताकडे वळली आहे. याशिवाय, उत्तर प्रदेशवर कमी दाबाचा पट्टा ज्याने बर्याच भागांमध्ये मान्सून लाट सक्रिय ठेवली होती तो देखील विलीन झाला आहेत.

अशा प्रकारे, सांता क्रूझ वेधशाळेने मागील २४ तासांत ५० मि.मी.च्या जोरदार पावसाची नोंद करण्यास आज पावसात घट रिकॉर्ड केली आहे. तथापि, एक दोन ठिकाणी आजही चांगला पाऊस पडू शकतो, परंतु उद्यापासून तीव्रता फारच सौम्य होईल ज्यामुळे रहिवाशांना प्रवास करणे सोपे होईल.

Updated on July 10, 02:47 PM : मुंबईत पाऊस परत वाढणार, बऱ्याच ठिकाणी वॉटर लॉगिंगची शक्यता

मुंबई मध्ये काल पावसाचा जोर कमीच राहिला व गेल्या २४ तासांत शहरात हलक्या ते मध्यम पावसाची नोंद करण्यात आली.

तथापि, येणाऱ्या काही तासांत, मुंबईत जोरदार पावसाची शक्यता आहे. एक दोन ठिकाणी खूप जोरदार  पावसाची देखील अपेक्षा आहे. पावसामुळे रहदारी प्रभावित होऊ शकते आणि वॉटर लॉगिंगची शक्यता नाकारता येणार नाही.

Updated on July 7, 03:46 PM : मुंबईत पाऊस सुरू राहणे अपेक्षित 

गेल्या २४ तासांत, मुंबईत पावसाचा जोर वाढलेला आहे. सांता क्रूझ मध्ये गेल्या २४ तासांत, ४१ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. कुलाबा मध्ये हि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. येथे गेल्या २४ तासांत, १२ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, मुंबईत विखुरलेला पाऊस येणाऱ्या दोन ते तीन दिवस सुरु राहील. याशिवाय, एक दोन ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

Updated on July 6, 07:46 PM:  मुंबईकर मिश्रित तीव्रतेचा पाऊस अनुभवतील

येणाऱ्या तीन ते चार दिवस, म्हणजेच १० जुलै पर्येंत मुंबईत मिश्रित तीव्रतेचा पाऊस सुरु राहील. मुख्यतः मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस देखील पडू शकतो.

Updated on July 5, 09:46 PM: मुंबईत पावसाचा जोर कमी राहणार

पुढील तीन ते चार दिवस मुंबईसह कोकण आणि गोवा येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा पाऊस अपेक्षित आहे. दरम्यान या कालावधीत काही भागात एक दोन जोरदार सरींची शक्यता नाकारता येत नाही.

त्यानंतर, एक प्रत्यावर्ती चक्रवाती प्रणाली दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि आसपासच्या हिंद महासागरात तयार होण्याची अपेक्षा असून त्यामुळे विषुववृत्त ओलांडून येणाऱ्या वाऱ्यांचा जोर कमकुवत होईल. या प्रणालीमुळे, वारे वायव्येकडून वाहतील, ज्यामुळे कोकण आणि गोवासह संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा जोर कमी होईल.

एकूणच, आपण असे म्हणू शकतो कि हा मान्सूनचा एक कमकुवत टप्पा असेल ज्याच्या दरम्यान मुंबई आणि उपनगरांत मोठ्या पावसाची शक्यता नाही. पाऊस केवळ हलका ते मध्यम स्वरूपाचा होईल. या संपूर्ण काळात शहरात २० ते ३० मिमी पाऊस नोंदण्याची अपेक्षा आहे.

Updated on July 4, 03:10 PM: कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकल्यामुळे मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता नाही, काही भागात चांगला पाऊस अपेक्षित 

मुंबईच्या सानिध्यात असलेला कमी दाबाचा पट्टा लक्षात घेता ३ ते ५ जुलै दरम्यान मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. तथापि, ही प्रणाली उत्तरेकडे राजस्थान आणि आसपासच्या मध्यप्रदेशात सरकल्यामुळे त्या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

दरम्यान आज मुंबईत कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची अपेक्षा आहे, त्याकाळात काही ठिकाणी जोरदार तर काही भागात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी थोड्या कालावधीसाठी एक-दोन जोरदार सरींची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय २४ तासांच्या कालावधीत काही ठिकाणी ३० ते ५० मि.मी. पावसाची नोंद होवू शकते.

Updated on July 3, 04:18 PM: चार दिवसात ७९५ मिमी पावसामुळे मुंबईचे कंबरडे मोडले, अर्धी मुंबई पाण्यात

शुक्रवारपासून जोरदार पाऊस पडत असून पावसाच्या तीव्रतेत देखील वाढ झाली आहे, शहरात शुक्रवारी तब्बल २३५ मिमी इतक्या जोरदार पावसाची नोंद झाल्यानंतर शनिवारी ९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रविवारी ९२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर, सोमवारी पहाटे ३७५ मिमी इतक्या मोठ्या पावसाची नोंद झाली.

अशा प्रकारे, मागील चार दिवसांत, शहरामध्ये ७९५ मिमी पावसाची नोंद झाली आहे ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जवळजवळ संपूर्ण शहर पाण्यामध्ये गेल्याने मुंबईकरांना विश्रांती मिळाली आहे. अर्धी मुंबई जवळपास पाण्याखाली गेली आहे आणि पाऊस थांबण्याची चिन्हे अजून दिसत नाहीत.

Updated on July 2, 04:18 PM: मुंबई पावसाचे थैमान २४ तासात ३७५ मिमी पाऊस, दशकातील सर्वाधिक पाऊस

मुंबईमध्ये पावसाचा कहर झाला असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचे आगमन विलंबाने झाले तरी मुंबईत सुरुवातीपासूनच पाऊस मुसळधार असल्याने संपूर्ण शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरात संततधार सुरु असून काल रात्री अतिवृष्टी झाली. काल ची रात्र पावसाच्या झंझावातामुळे जुलै मधील सर्वाधिक पावसाची रात्र ठरू शकेल.

गेल्या २४ तासांत सांताक्रूझ वेधशाळेमध्ये ३७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे जी या दशकात सर्वाधिक आहे. यापूर्वी २००९ साली शहरात २७४.१ मिमी पाऊस झाला होता. तसेच २००५ साली शहरात २४ तासांच्या कालावधीत सगळ्यात जास्त ९४४. २ मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली होती.

Updated on July 1, 05:21 PM: जुलै महिन्याची चांगली सुरुवात, गेल्या ६ तासांत, मुंबईत ६३ मिलीमीटर पाऊस

गेल्या ६ तासांत, म्हणजेच काल ११:३० पासून ते आज सकाळी ५:३० पर्येंत, सांता करुझ मध्ये ६३ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. त्याआधी, काल ११ मिलीमीटर पाऊस पडलेला आहे.

मुंबईत पाऊस पडत राहणेच अपेक्षित आहे. तथापि पावसाचा जोर किंचित कमी होईल, असे दिसून येत आहे.

३ जुलैच्या रात्रीपासून मुंबईत पावसाची तीव्रता वाढण्याची अपेक्षा आहे. या कालावधीत जोरदार पाऊस शहरातील बऱ्याच भागात अनुभवण्यात येईल.

संपूर्ण जुलै महिन्यात मुंबईत चांगला पाऊस पडेल. जुलै महिन्यात काही तीन अंकी पाऊस अपेक्षित आहे.

Updated on June 30, 05:02 PM: २४ तासानंतर मुंबईत पावसाचा जोर कमी होणे अपेक्षित 

गेल्या २४ तासांत, सांता करुझ मध्ये ९३ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे तर कोलाबा मध्ये ७४ मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. आज, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. येथे गेल्या ३ तासांत, ७ मिलीमीटर पाऊस पडलेला आहे.

आता, २४ तासानंतर पाऊस कमी होणे अपेक्षित आहे आणि हलका ते मध्यम पाऊस सुरु राहील, असे दिसून येत आहे. पुढे, ४ जुलै दरम्यान, पावसाचा जोर परत वाढणे अपेक्षित आहे.

Updated on June 28, 05:24 PM:  मुंबईत मुसळधार पाऊस; शहरातील जनजीवन विस्कळीत, वाहतुकीची कोंडी

दीर्घकाळ उष्ण व कोरड्या वातावरणानंतर देशाची आर्थिक राजधानी, मुंबई मध्ये सकाळी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मान्सूनच्या आगमनाला जरी विलंब झाला तरी आता प्रतीक्षा संपली असून आगामी काही दिवसांतच मुंबईकर मुसळधार मोसमी पावसाचा अनुभव घेतील. बऱ्याच प्रसार माध्यमांच्या अहवालांनुसार, मुसळधार पावसामुळे मुंबई मधील बऱ्याच भागात पाणी साचले असून पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे आणि रस्त्यांवर वाहतूककोंडी ची समस्या भेडसावत आहे. धारावी आणि पूर्व वसई मधील भोईदापाडा नाका येथे खूप प्रमाणात पाणी साचले आहे. ठाणे मधील मखमली तलाव, सायन आणि हिंदमाता सिनेमाच्या परिसरात देखील पाणी साचले आहे

Updated on June 28, 12:33 PM: मुंबईत ३ तासांत ९६ मिलीमीटर पाऊस, पाऊस चालू राहण्याची शक्यता 

मुंबई पावसाचे प्रमाण इतके तीव्र झाले आहे की सांता क्रूझ वेधशाळेत फक्त ३ तासांत ९६ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

Updated on June 28, 11:06 AM: मुंबईत मान्सूनचा जोर वाढलेला असून आज जोरदार पावसाची अपेक्षा 

मुंबईत पावसाची गतिविधी सुरू झाली आणि काल रात्री पनवेल, बदलापूर, शहापूर आणि आसपासच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडला आहे. बीकेसी, कुर्ला, वाशी, चेंबूर, सांता क्रूझ, कोलाबा, बोरिवली, कांदिवली आणि काही इतर भागांवर देखील पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

आजही सकाळी मुंबईत ढगाळ आकाशासह पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. मुंबईत मॉन्सूनच्या पावसाचा जोर वाढलेला आहे आणि तेव्हापासून मुंबईवर पाऊस सुरूच आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, मुंबईत पाऊस आज दिवसभर चालू राहण्याची अपेक्षा आहे. या कालावधीत बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस अनुभवण्यात येईल.

Updated on June 27, 03:09 PM: मुंबईत पावसाचा जोर वाढणार, पुढील ४८ तासांत मुसळधार

मुंबईत पावसाचा जोर वाढलेला आहे. मागील २४ तासात कुलाबा वेधशाळेत ४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामानतज्ञांनी आधीच वर्तविल्यानुसार आजपासून मुंबईत मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे आणि दिवस जसजसा पुढे सरकेल तसा पावसाचा जोर देखील वाढण्याची अपेक्षा आहे.२९ जून पर्यंत मुंबईत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. सक्रिय झालेला मान्सून आणि त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर असलेली ट्रफ व बंगालच्या पूर्व-मध्य खाडीवर उपस्थित चक्रवाती प्रणालीला या पावसाचे श्रेय दिले जाऊ शकते.

Updated on June 26, 10:32 PM: मुंबई मध्ये मॉनसून जोर धरणार, २७ ते २९ जून दरम्यान २०० मि.मी. पावसाची शक्यता

सक्रिय मान्सूनमुळे पश्चिम किनाऱ्यालगत एक ट्रफ रेषा विस्तारत आहे. याव्यतिरिक्त,पूर्व-मध्य अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर चक्रवाती प्रणाली उपस्थित आहे. यामुळे पुढील३-४ दिवसांच्या काळात मुंबईत अतिशय जोरदार पावसाची नोंद होईल. मुंबईकर २७ जून ते २९ जून च्या दरम्यान २०० मि.मी.इतका पाऊस अनुभवू शकतात.

हवामानतज्ञांच्यानुसार, आज रात्रीपासून पावसात वाढ होईल आणि त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर वाढेल. पावसाचा जोर वाढून २७ जूनच्या संध्याकाळपासून मुंबई मध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Updated on June 25, 01:44 PM: मुंबईत मॉन्सूनचे आगमन, पावसाचा जोर वाढणार

१५ दिवसांचा विलंब झाल्यानंतर, दक्षिण पश्चिम मॉनसून २०१९ चे मुंबईत आगमन झाले आहेत. सध्या मुंबईत ढगाळ आकाशासह तुरळक ठिकाणी पावसाची नोंद करण्यात येत आहे.

मुंबई मध्ये उद्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची परतण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर २७ जून रोजी वाढणे अपेक्षित आहे व ३० जून च्या आसपास काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची अपेक्षा आहे.

Updated on June 24, 03:45 PM: मुंबईत पावसाचा जोर वाढणे अपेक्षित, मॉन्सूनचे आगमन आता कधीही 

मुंबईसह उत्तर कोंकण व गोव्यात गेल्या २४ तासांत, हवामान कोरडेच राहिलेले आहे. एक दोन ठिकाणी तुरळक पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. तथापि, उपस्थित असलेल्या ट्रफ रेषेमुळे, मुंबई आणि त्याच्या आसपास येणाऱ्या २४ तासांत, पावसाचा जोर वाढणे अपेक्षित आहे. पुढील, २७ जून रोजी मुंबईसह संपूर्ण उत्तर किनारी महाराष्ट्रात जोरदार पावसाची अपेक्षा आहे.

मुंबईत मॉन्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा आता कधीही संपू शकते. गेल्या ४८ तासांत, मॉन्सून २०१९ ची प्रगती झाली आहे. मॉन्सून आधीच अलिबागपर्येंत पोहोचून गेला आहे व मॉन्सूनला पुढे जाण्यासाठी व मुंबईत प्रवेश करण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.

Updated on June 23, 05:09 PM: मुंबईत हलका ते मध्यम पाऊस सुरु राहणे अपेक्षित

गेल्या काही दिवसापासून मुंबईत पावसाचा जोर कमीच राहिलेला आहे. गेल्या 24 तासांत शहरात काही ठिकाणी हलका पाऊस अनुभवला गेला आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत मुंबईत हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे.

दक्षिण-पश्चिम मॉन्सून २०१९ ने मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये प्रवेश केला आहे आणि मराठवाडातील बहुतांश भाग देखील मॉन्सूनचा पाऊस अनुभवत आहे.

शिवाय, 25 जूनपर्यंत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मॉन्सूनच्या आगमनासाठी हवामानाची परिस्थिती अनुकूल आहे. त्यानंतर मुंबईत चांगला पाऊस पडेल.

Updated on June 21, 02:24 PM: मुंबईत पावसाचा जोर कमीच राहणे अपेक्षित

चक्रीवादळ वायुमुळे मुंबई मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची नोंद करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर, पावसाच्या जोरात लक्षणीय घट नोंदवली गेली आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून मुंबईत ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची नोंद करण्यात येत आहे.

आता, येणाऱ्या दोन ते तीन दिवसात, पावसाची तीव्रता कमीच राहण्याची अपेक्षा आहे. तथापि, २३ जून रोजी, एक दोन ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर २६ जून दरम्यान वाढेल. त्या कालावधीत, बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची अपेक्षा आहे ज्यामुळे येथे मॉन्सूनचे आगमन होईल.

Updated on June 20, 04:14 PM: मुंबईत २३ जून पर्यंत ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची अपेक्षा 

मुंबईत २३ जून पर्यंत ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची अपेक्षा आहे. पावसाचा जोर येथे कमी राहील. तापमानात देखील लक्षणीय वाढ दिसून येईल. याशिवाय, उष्णता जास्त राहील. पुढे, २४ जून रोजी, मुंबई आणि त्याच्या आसपास पावसाचा जोर पुन्हा वाढणे अपेक्षित आहे ज्यामुळे येथे मॉन्सूनचे आगमन होईल.

दरम्यान, दक्षिण कोंकण व गोव्यावर चांगला पूर्व मॉन्सूनचा पाऊस अनुभवण्यात येईल.

Updated on June 18, 04:22 PM: मुंबईत हलका पाऊस पडत राहणे अपेक्षित

चक्रीवादळ वायु आता कमकुवत झाले आहे ज्यामुळे मुंबई शहरात पावसाची तीव्रता कमी होणे अपेक्षित आहे. अशा प्रकारे मुंबईसह तटीय भागात २३ जूनपर्यंत हलका पाऊस सुरू राहील, अशी अपेक्षा आहे. तथापि, त्यानंतर विकसित होणाऱ्या हवामान प्रणालीमुळे पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा आहे. येणाऱ्या २४ तासात, मुंबईत कोलाबा आणि सांता करुज, येथे हलक्या पावसाची अपेक्षा आहे

Updated on June 17, 04:43 PM: मुंबईत कमी होणार पावसाचा जोर 

आज आणि उद्या मुंबईत पावसाळी क्रिया चालू राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर, चक्रीवादळ वायुच्या प्रभावाने वाहणारे दक्षिण-पश्चिम वाऱ्यांचा प्रभाव कमी होईल. परिणामी, पावसाची तीव्रता कमी होईल.

Updated on June 16, 05:10 PM: मुंबईत पाऊस सुरूच राहणार, चक्रीवादळ वायुचा प्रभाव कायम

मुंबई शहर परिसरात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू राहील. शिवाय, गोव्यापासून केरळ पर्यंत एक ट्रफ रेषा विस्तारत आहे ज्यामुळे मुंबई शहरातील आर्द्रता वाढू शकते ज्यामुळे पाऊस होईल. सध्याच्या हवामानाच्या परिस्थितीबद्दल सांगायचे तर सकाळपासून मुंबई शहरात आज आकाश ढगाळ आहे. ज्यामुळे आजही काही भागात पावसाची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही.

Updated on June 14, 12:27 PM: आज आणि उद्या मुंबईत पावसाची शक्यता

मुंबईकरांनी आज सकाळी ढगाळ आकाशासह पावसाचा आनंद घेतला आहे. गेल्या २४ तासात, सांता करुज मध्ये ०.३ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे, तर कोळंब मध्ये ६.० मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. पावसामुळे हवामान आनंददायी झाले आहेत. याशिवाय, तापमानात देखील लक्षणीय घट नोंदवण्यात आलेली आहे. आज आणि उद्या मुंबईत पाऊस पडत राहणे अपेक्षित आहे.

Updated on June 13, 10:39 AM: मुंबईतील ४०० उड्डाणांवर चक्रीवादळ वायुचा प्रभाव

अतिशय तीव्र चक्रीवादळ वायुमुळे मुंबईतील ४०० उड्डाणांवर प्रभाव पडलेला आहे. एका अधिकार्यानुसार, वाईट हवामानाच्या परिस्थितीमुळे बुधवारी १९४ फ्लाइट्सच्या टेक ऑफ मध्ये व  १९२ फ्लाइट्सच्या लैंड मध्ये विलंब झाला आहेत. याशिवाय, २ फ्लाइटचा रूट वळविला गेला आहेत. मुंबईतून ९०० विमानांचे दैनिक प्रक्षेपण आहे.

Updated on June 12, 1:30 PM: चक्रीवादळ वायु पश्चिम/दक्षिणपश्चिम मुंबईच्या जवळ, मुंबईत पाऊस सुरु

चक्रीवादळ वायुमुळे मुंबईत पावसाची सुरुवात झालेली आहे. ठाणे आणि वाशी मध्ये हलक्या पावसाची नोंद करण्यात येत आहे. चक्रीवादळ वायु सध्या मुंबईच्या सुमारे २९० किमी पश्चिम/दक्षिण पश्चिम स्थित आहे आणि उत्तरेकडे जाईल.७० ते ८० वेगाने वारे वाहतील.

Updated on June 12, 11:00 AM: चक्रीवादळ वायु मुंबईच्या समांतर रेखा वर, मुंबईत आज पावसाची शक्यता

चक्रीवादळ वायु मुंबईच्या पश्चिमेकडे जाईल. दुपारी, मुंबईच्या समांतर येईल. शहराच्या जवळजवळ २६० किलोमीटर पश्चिमेकडे आणि सौराष्ट्र कोस्टकडे प्रवास करेल. आज मुंबईत चांगल्या पावसाची शक्यता आहे. हवामान आनंददायी होईल. ६० किलोमीटरच्या वेगाने वारे देखील वाहतील.

Updated on June 11, 6:00 PM: होणाऱ्या पावसामुळे असे दिसून येत आहे की मुंबईत लवकरच  मॉन्सूनचे आगमन होईल. मुंबईत मॉन्सून एक आठवड्याच्या विलंबानंतर उशिरा पोहोचणे अपेक्षित आहे.

Updated on June 11, 2:30 PM: मुंबईत पावसाची सुरुवात झाली आहे. वाशी मध्ये मेघगर्जनेसह चांगल्या पावसाची नोंद करण्यात येत आहे. मुंबई मध्ये अजून काही ठिकाण पाऊस अनुभवतील. चक्रीवादळ वायु मुंबईच्या जवळ पोहोचण्याची अपेक्षा आहे. संध्याकाळी, मुंबईत चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.

Updated on June 11, 9:00 AM: मुंबईत एक दोन ठिकाणी चांगल्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. खरं तर, मुंबई मध्ये हा पहिलाच चांगला पूर्व मॉन्सूनचा पाऊस आहे. गेल्या २४ तासात, संता करुज मध्ये ४० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे .

अरब सागर मध्ये बनलेला चक्रीवादळ वायु दुपार पर्यंत उत्तर उत्तर पश्चिम दिशेत चालण्याची अपेक्षा आहे .

Published on June 10, 11:00 PM: मुंबई मध्ये पाऊस सुरु झालेला आहे. काही ठिकाणी चांगल्या पावसाची नोंद करण्यात येत आहे. खारघर, वाशी आणि संपदा मध्ये मेघगर्जनेसह चांगल्या पावसाची शक्यता आहे.

मुंबईतील अजून काही भाग देखील पाऊस अनुभवतील. या पावसामुळे मुंबई लोकल उशीरा धावत आहेत. शिवाय, या पर्जन्यवृष्टीमुळे फ्लाइट देखील विलंब झाले आहेत.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे


For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Weather Forecast

Other Latest Stories

Weather on Twitter
@drkowsarhossain Same to you :)
Thursday, August 15 10:10Reply
@elangoram Sir, we are still standing with our forecast.
Thursday, August 15 09:46Reply
Now the rain activities have decreased over interior parts of Maharashtra particularly Vidarbha and Marathwada and… t.co/ITnwiYfclR
Thursday, August 15 09:08Reply
Wednesday, August 14 20:30Reply
Good #rains are happening North of Indore in places like #Guna and #Ujjain where 62 mm and 39 mm of rain has been r… t.co/74Q1CGnmoU
Wednesday, August 14 20:00Reply
#Weather Forecast Aug 15: Heavy #rains in East #Rajasthan, West #MadhyaPradesh and parts of #Kerala t.co/ISTGo697bH
Wednesday, August 14 19:30Reply
#Monsoon2019 Forecast August 15: #Monsoon rains to lash parts of #Rajasthan, and #MadhyaPradesh t.co/UarInrcpcD
Wednesday, August 14 19:00Reply
Today rains will pick up some pace in Mumbai and one or two moderate spells are likely during the next 24 hours.… t.co/IbSw6Mg9XD
Wednesday, August 14 18:57Reply
दिल्ली में आज भी जारी रह सकती है बारिश, सप्ताह के अंत में दिखेगा मॉनसून का जोरदार रूप #Delhi #DelhiRaint.co/hKLIlJN9D2
Wednesday, August 14 18:53Reply
Flood situation in the state of #Karnataka is now improving as flood waters have started to recede in the affected… t.co/lqCt2ubIi5
Wednesday, August 14 18:43Reply

latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try