ऑक्टोबर महिन्याची सुरुवात म्हणजे द्वीपकल्पाच्या भागात दोन मान्सून पर्वांची एकत्रितपणे असण्याची वेळ. कारण याच दरम्यान नैऋत्य मान्सून संपत असतो आणि ईशान्य मान्सूनला सुरुवात होते. आणि याच वेळेत द्वीपकल्पाच्या भागात भरपूर पाऊस होतो.
सध्यस्थितीत या भागात होणारा पाऊस हा दुपारीच भरपूर प्रमाणात येतो. ईशान्य मान्सूनच्या आगमनानंतर या पावसाची वेळ आणि तीव्रता यात बदल होतो. तेंव्हापासून मात्र पाऊस संध्याकाळी उशिरा सुरु होऊन पहाटे पर्यंत सुरूच राहतो.
या लेखात आपण ईशान्य मान्सून बद्दल माहिती बघणार आहोत. या ईशान्य मान्सूनला भारतात हिवाळी मान्सून असेही संबोधले जाते.
ईशान्य मान्सून:
1. ईशान्य मान्सून ऑक्टोबर महिन्याच्या मध्य काळात सुरु होता आणि डिसेंबर महिन्यापर्यंत सुरु असतो. या मान्सूनच्या आगमनाची मात्र ठराविक अशी वेळ किंवा दिनांक सांगता येत नाही.
2. भारतीय द्वीपकल्पाच्या पाच उपभागांवर या मान्सूनचा परिणाम होतो. त्यात तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेशची किनारपट्टी, रायलसीमा आणि दक्षिण कर्नाटकचा आतील भाग यांचा समावेश होतो.
3. या काळात द्वीपकल्पाच्या इतर भागातही थोडाफार पाऊस होताना दिसून येतो. काहीवेळा मुंबईपर्यंत सुद्धा पाऊस अनुभवावयास मिळतो.
4. तामिळनाडूसाठी ईशान्य मान्सून हा मुख्य मान्सून मानला जातो. या राज्याच्या किनारपट्टीला वार्षिक पावसाचा आढावा घेतल्यास या काळात सर्वात जास्त म्हणजे ६०% पाऊस होतो. आणि आतील भागात ईशान्य मान्सून मुळे ४०% पाऊस होतो.
5. ईशान्य मान्सून मध्ये होणाऱ्या पावसाच्या आकडेवारीची दीर्घकालीन सरासरी नुसार या काळात म्हणजेच NEMR (Northeast Monsoon) मध्ये ३१२ मिमी पावसाची नोंद होते आणि त्यात ८४ मिमी कमी अधिक पाऊस होऊ शकतो.
6. ईशान्य मान्सून मुख्यत्वे पूर्वेकडून येणाऱ्या लहरी, चक्रवाती अभिसरण आणि चक्रीवादळ या मुळे होतो.
7. या मान्सून काळात ऑक्टोबर महिना हा सर्वात जास्त पावसाचा असतो आणि मग नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जास्त पाऊस होतो. खाली दिलेल्या तक्त्यात याचा अंदाज येईलच. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणारा पाऊस हा बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे होतो.
8. पूर्व किनारपट्टी मात्र या चाक्रीवादालांपासून असुरक्षित असते. गेल्या दोन वर्षातील फायलीन, हेलन, हुडहुड आणि निलोफर या चक्रीवादळांवरून आपण असे म्हणू शकतो.
9. आंध्रप्रदेशची किनारपट्टी आणि तामिळनाडू येथे सर्वात आधी मोठा आणि व्यापक पाऊस होतो आणि ईशान्य मान्सूनची नांदी होते.
Image Credit: karmakerala.com