[Marathi] कोल्हापूर, महाबळेश्वर आणि पुणे येथे आणखी एक पावसाळी दिवस, मुंबईत तुरळक पावसाची शक्यता

October 8, 2019 12:53 PM|

Monsoon

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अलीकडे चांगल्या पावसाळी गतिविधी सुरु आहेत. गेल्या चोवीस तासांच्या कालावधीत अहमदनगरमध्ये ३० मिमी तर महाबळेश्वरमध्ये ११.१ मिमी पावसाची नोंद झाली.

दरम्यान, कोकणातील रत्नागिरी व हर्णे येथे ११ मिमी आणि १०.९ मिमी पावसाची नोंद झाली. तथापि, मुंबईतील हवामान प्रामुख्याने कोरडे व उबदार राहिले.

आमच्या हवामानशास्त्रज्ञांच्या मते,मध्य महाराष्ट्रातआणखी काही काळ पाऊस पडण्याची शक्यता असून प्रामुख्याने सांगली, सातारा, कोल्हापूर आणि महाबळेश्वर येथे पुढील २४ तासांत एक किंवा दोन जोरदार सरींसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, पुणे शहरावर तुरळक सरींची शक्यता आहे.

यादरम्यान,मुंबई आणि उपनगरामध्येपुढील २४ तास तरी पावसाची शक्यता नाही. तुरळक हलक्या सरींची शक्यता असल्याने शहरात हवामान कोरडेच राहण्याची शक्यता आहे. विदर्भातही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान २४ तासांनंतर, राज्यातील बहुतांश भागांतील पावसाळी गतिविधीमध्ये लक्षणीय घट होईल त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील हवामान कोरडे होईल. तथापि, दक्षिण कोकण आणि गोवा तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात ११ किंवा १२ ऑक्टोबरपर्यंत तुरळक सुरु राहण्याची शक्यता आहे.

तसेच ऑक्टोबरच्या तिसर्‍या आठवड्यात महाराष्ट्रातून मान्सून परतण्याचा अंदाजही हवामानशास्त्रज्ञांनी वर्तविला आहे.

Image Credits – India Today

Any information taken from here should be credited to Skymet Weather

author image