Skymet weather

[Marathi] मुंबई मध्ये २४ मे च्या आसपास पावसाची शक्यता

May 19, 2019 2:31 PM |

Mumbai rains

 

मागील काही दिवसांपासून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ मध्ये कोरडे आणि गरम हवामान अनुभवण्यात येत आहे. याउलट, महाराष्ट्राच्या किनारी भागात अतिशय गरम हवामानसह उष्णता अनुभवण्यात येत आहे.

मे च्या सुरुवाती पासूनच महाराष्ट्रात कोरडे हवामान चालू आहे आणि फक्त विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलका पाऊस अनुभवला गेला आहे.

Also read in English: Rain in Mumbai, Maharashtra around May 24, dry and hot weather to continue until then

सध्या, उत्तर पश्चिम दिशेने कोरडे वारे राज्यात वाहत आहे, ज्यामुळे विदर्भात उष्णतेची लाट अनुभवण्यात येत आहे. याशिवाय, कोणत्याही महत्वपूर्ण हवामान प्रणालीच्या अनुपस्थित, येथे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात, हवामान कोरडेच राहणे अपेक्षित आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीत २४ मे च्या आसपास बदल दिसून येईल. एक ट्रफ रेषा कोंकणच्या किनारी भागांवर विकसित होईल. ही ट्रफ उत्तर महाराष्ट्र पर्यंत विस्तारली जाईल. ज्यामुळे २४ मे रोजी दक्षिण महाराष्ट्र मध्ये आकाशढगाळसह पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील ठिकाण जसे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि मुंबई या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याशिवाय, या भागांना येणाऱ्या पावसामुळे गरम हवामानापासून सुटका मिळेल.

याउलट, राज्यातील अन्य भाग, कोरडे आणि गरम हवामान अनुभवतील. येणाऱ्या एक आठवड्यात, विदर्भ मध्ये उष्णेतची लाट सुरु राहील.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try