Skymet weather

[Marathi] विमान प्रवासादरम्यान कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याचा सर्वोत्तम मार्ग

February 13, 2020 9:44 AM |

coronavirus in China

विमान प्रवासा दरम्यान प्रत्यक्षात दुसऱ्या व्यक्तीशी शारीरिक संपर्कात आल्यामुळे कोरोना व्हायरसच्या संसर्गाची संभाव्य जोखीम असते, कारण विषाणू आसनांवर किंवा सीटच्या हँडलवर जास्त तास राहू शकत नाही.

फ्लाइटच्या आत फक्त मास्क किंवा रबरी हातमोजे घालणे पुरेसे नाही. खरं तर, मास्क आणि ग्लोव्हज त्यांच्या प्रवाहावर मर्यादा घालण्यापेक्षा जास्त विषाणू पसरवित आहेत. आंतरराष्ट्रीय एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे एक चिकित्सक आणि वैद्यकीय सल्लागार डेव्हिड पॉवेल यांच्यानुसार, कोरोना व्हायरस टाळण्यासाठी वारंवार हात धुणे हा एक उत्तम मार्ग आहे.

विमानाच्या आत होणारा हवेचा पुरवठा हा चित्रपटगृहात किंवा कार्यालयाच्या इमारतीच्या आतील भागांमध्ये होणाऱ्या हवेच्या पुरवठ्यापेक्षा वेगळा असतो, सर्वसाधारणपणे विमानात ताजी हवा आणि रीसर्क्युलेटेड हवेचे मिश्रण वापरले जाते, या कारणाने उड्डाणादरम्यान गंभीर संक्रमण होण्याचा धोका कमी असतो.

त्यानंतर रीसर्क्युलेटेड हवा ऑपरेशन थिएटरमध्ये वापरल्या जाणार्‍या फिल्टर सारख्या फिल्टर मधून जाते. अशाप्रकारे, विमानामधील पुरविली जाणारी हवा ९९.९७% बॅक्टेरिया किंवा व्हायरसपासून मुक्त आहे. खरं सांगायचे तर संक्रमणाचे प्रसरण पुरवलेल्या हवेमुळे होत नाही तर दुसर्‍या व्यक्तीशी शारीरिक संपर्क साधल्यामुळे होते.

Image Credits – CNN.com

Any information taken from here should be credited to Skymet Weather
For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories


latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try

×