Skymet weather

[Marathi] गारपिटीचे मराठवाडा आणि विदर्भात पुनरागमन, पिकास नुकसान होण्याचा धोका

March 15, 2018 7:06 PM |

maharashtraमागील बऱ्याच दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात हवामान मुख्यतः कोरडे राहिलें आहे. तसेच  तापमानातवाढ होऊन तापमान सरासरीपेक्षा २-३ अंशाने जास्त असून ३० ते ३५ अंशाच्या  वर नोंदले जात आहे.

सद्यस्थितीत छत्तीसगढ पासून कमी दाबाचा पट्टा मराठवाडा आणि व विदर्भावरुन तेलंगणा पर्यंत आहे. अरबीसमुद्रात कर्नाटक च्या भागात असणारी  प्रणाली मुले  ह्या भागात ढगाळ हवामान तयार झाले आहे. ढगाळहवामानामुळे तापमानात घट  होण्यास मदत झाली. कमाल तपमान काहीसे कमी झाले आहे. तर किमानतापमानात काहीही बदल झाला नाही.

[yuzo_related]

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत, उद्या दुपार नंतर मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यताआहे. गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही. हवामानातील वाढलेले तापमान  गारपिटीस पोषक असते. विदर्भआणि मराठवाड्याच्या ऊत्तर भागात आहे पाऊस  पडायची शक्यता आहे.  तर उद्या  दक्षिण भागात पाऊसपडेल. आज,अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर आणि औरंगाबाद भागात पाऊस पडायची शक्यता आहे. तरउद्या  नांदेड, उस्मानाबाद, परभणी, यवतमाळ, आणि वाशीम भागात पाऊस पडेल.

बदलत्या हवामानात शेतीची करावयाची कामे

शेतकरी  बांधवानी रब्बी हंगामातील तयार पिके काढून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावी.तापमानातीलबदलांमुळे, भाजीपाला, भुईमूग  पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकारी बांधवानीआवश्यक ती खबरदारी घ्यावी. पावसाच्या शक्यतेमुळे शेतकरी बांधवानी भुईमूग आणि मका पिकास  गरजेनुसार पाणी  दयावे. त्याप्रमाणेच पावसाची शक्यता लक्षात घेऊन संत्रा , मोसंबी, द्राक्ष आणि डाळिंब फळांचीकाढणी करावी.






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try