Skymet weather

हवामान अंदाज 23 ऑक्टोबर: दक्षिण कोकण आणि गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम से मुसळधार पाऊस अपेक्षित

October 22, 2019 6:50 PM |

दक्षिण भारतात, कमी दाबाचे क्षेत्र कोस्टल आंध्र प्रदेशवर आहे आणि चक्रवाती परिस्थिती उत्तर कर्नाटकच्या किनारपट्टीवर आहे. या हवामान प्रणालीमुळे, आम्ही आंध्र प्रदेश, तटीय कर्नाटक आणि उत्तर केरळच्या काही भागांत जोरदार ते मुसळधार पावसाची अपेक्षा करतो. कर्नाटक, रायलसीमा आणि तामिळनाडूच्या काही भागात एक दोन जोरदार सरींसह हलका ते मध्यम पाऊस पडेल. तसेच हलका ते मध्यम पाऊस तेलंगणामध्ये दिसू शकतो.

मध्य भारतात,दक्षिण कोकण आणि गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तर दक्षिण पूर्वी मध्य प्रदेशात एक दोन ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुजरात आणि राजस्थान तसेच पश्चिम मध्य प्रदेशातील हवामान कोरडे राहील.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

आपल्या देशाच्या पूर्वेकडील भागांत, दक्षिण ओडिशामध्ये मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर दक्षिण बिहार, उर्वरित ओडिशा, गंगीय पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडेल. ईशान्य भारतामध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. तथापि, विखुरलेला हलका पाऊस पडू शकतो.

आपल्या देशाच्या उत्तर भागात जम्मू-काश्मीरमध्ये पश्चिमी विक्षोभ आहे. जम्मू-काश्मीरच्या वरच्या भागात हलक्या पावसासह एक दोन ठिकाणी बर्फवृष्टीची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशातही एक दोन ठिकाणी पाऊस पडू शकतो.

Any information taken from here should be credited to skymetweather.com







For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories






latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try

×