Skymet weather

JATIN SINGH, MD SKYMET: या आठवड्यात ईशान्य मान्सून सक्रिय राहणार, आठवड्याच्या सुरुवातीस दिल्लीत मध्यम पावसासह उत्तर भारतात प्रदीर्घ पावसाळी गतिविधी

November 27, 2019 6:35 PM |

rain in North India

जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या तिन्ही डोंगराळ भागांसह उत्तर भारतात २५ ते २८ नोव्हेंबर दरम्यान दीर्घकाळ पाऊस आणि बर्फवृष्टी होईल. या दरम्यान पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेश या भागांसह उत्तरेकडील मैदानांवरही पाऊस पडेल.

वर उल्लेखलेल्या पाऊस आणि बर्फवृष्टीचा परिणाम सुरुवातीला तापमान वाढीत होईल आणि हा कालावधी पूर्ण झाल्यावर, काही भागात किमान तापमान घसरून एक अंकी होण्याची शक्यता आहे.

ईशान्य मान्सून गतिविधींमध्ये विशेषत: तामिळनाडूमध्ये वाढ होत असून २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या दरम्यान पावसाळी गतिविधींच्या वाढीमुळे उत्साह वाढेल. दरम्यान ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान चेन्नईत मुसळधार पावसाची अपेक्षा केली जावू शकते.

आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचा भाग वगळता उर्वरित चारही उपविभागांत म्हणजेच तामिळनाडू, केरळ, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि रायलसीमा चांगला पाऊस पडेल. मुसळधार पाऊस हा बहुधा तामिळनाडू पुरताच मर्यादित राहील.

मध्य भारतात पश्चिम मध्य प्रदेश वगळता कोरडी परिस्थिती दिसून येईल, पश्चिम मध्य प्रदेशात पाऊस पडण्याची शक्यता आहे, उर्वरित राज्ये म्हणजेच महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये कोरडे हवामान असेल.

पूर्व आणि ईशान्य भारतातही कोरडी स्थिती राहील व रात्रीच्या तापमानात थोडी घट दिसून येईल.

दिल्ली-एनसीआर

२५ ते २८ नोव्हेंबर दरम्यान दिल्ली एनसीआरमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, विशेषत: २६ आणि २७ तारखेला दिल्लीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. परिणामी किमान तापमान घसरून एक अंकी होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट ते गंभीर श्रेणीत असण्याची शक्यता आहे आणि पावसाळ्यानंतर, हवेची गुणवत्ता खराब प्रवर्गात येईल, अशी अपेक्षा आहे.

चेन्नई

या आठवड्यात चेन्नईत सक्रिय ईशान्य मान्सूनची स्थिती असेल आणि २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पीक विषयक सल्ला

आठवड्यात पावसाची अपेक्षा पाहता पिकांना सिंचन करणे टाळा. पालेभाज्यांच्या पेरणीसाठी जमीन तयार करा. गव्हाची पेरणी अद्याप झालेली नसेल तर त्यासाठी जमीन तयार करा.

Image Credits – Latestly

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try