Skymet weather

[Marathi] मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळी भागात चांगला पाऊस तर उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी होणार

August 19, 2019 1:27 PM |

Maharashtra rains

मुसळधार पाऊस पडल्यानंतर महाराष्ट्र राज्यात पावसाच्या तीव्रतेत आता लक्षणीय घट झाली आहे. वस्तुतः गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील बहुतेक भागांमध्ये कोरडे हवामान दिसून येत आहे. पावसाच्या अभावी तापमानात वाढ झाली असून मुंबईमध्ये दमट वातावरण आहे.

आमच्या हवामानतज्ञांनुसार पुढील तीन ते चार दिवस मुंबईमध्ये पावसाचे प्रमाण कमी होऊन वातावरण जवळजवळ कोरडे राहील.

दरम्यान, उत्तर कोकण आणि गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात पावसाळी गतिविधी कमी होतील ,काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, दक्षिणेकडील जिल्ह्यात थोडयाफार प्रमाणात मध्यम पावसाची शक्यता आहे.

हवामान प्रणालींविषयी सांगायचे झाल्यास झारखंड आणि त्यालगतच्या पश्चिम बंगाल जवळील कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू पश्चिम दिशेने प्रवास करून देशाच्या मध्य भागांच्या जवळ येईल. या हवामान प्रणालीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या दुष्काळी भागांत पावसाळी गतिविधींत वाढ होईल. पुढील दोन दिवसात विदर्भात एक-दोन मुसळधार सरींसह मध्यम पावसाची शक्यता आहे.

२१ ऑगस्टपर्यंत मराठवाड्याच्या काही तुरळक भागांत जोरदार सरींसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. या गतिविधी बहुतांशी मराठवाड्याच्या उत्तर भागांपुरत्या मर्यादित असून पुढील तीन दिवस सुरू राहतील. या बरोबरच मुंबई आणि उपनगरासह उत्तर कोकण आणि गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात पावसाळी गतिविधी कमी होतील.

Image Credits – The Indian Express

Any information taken from here should be credited to Skymet Weather







For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories






latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try

×