Skymet weather

MD Skymet, Jatin Singh: यावर्षी होळीवर हवामाना ऐवजी कोरोना व्हायरसच्या भीतीचे सावट. स्कायमेटने डोंगराळ भागांत हिमस्खलनाचा इशारा दिला असून चेन्नईत हवामान उष्ण आणि दमट असेल

March 9, 2020 4:00 PM |

holi weather

अपेक्षेप्रमाणे, मागील आठवड्यात काही भागांत हवामानाचा प्रतिकूल परिणाम झाला आणि पुढच्या काही आठवड्यात कापणीच्या तयारीत असलेल्या पिकांमुळे शेतकर्‍यांना चिंताग्रस्त करून सोडले. पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान, दिल्ली एनसीआर आणि उत्तर प्रदेशात वादळी वाऱ्यांसह गारपीट व जोरदार पाऊस झाला. यामुळे पंजाबमधील माझा भागात आणि विशेषत: अमृतसरच्या लगतच्या भागातील पिके आडवी झाली आहेत. मध्य प्रदेशातील सिंगरौली, सिवनी आणि मुरैना जिल्ह्यांमधील अनेक गावात गारपिटीचा फटका बसल्याची बातमी आहे. या अवेळी गतिविधींमुळे गहू, हरभरा आणि मोहरीच्या पिकाचे नुकसान झाले आहे. पंजाब, हरियाणा आणि राजस्थान ही राज्ये बाधित क्षेत्रात झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करीत आहेत. याव्यतिरिक्त, झारखंड ,पश्चिम बंगाल व ओडिशासह पूर्वेकडील राज्यातही काही ठिकाणी गारपीटीसह मुसळधार पाऊस झाला.

कोविड -१९ ने होळी उत्सवावर विरजण घातले असून रविवारी केरळमधील आणखी ५ लोकांची तपासणी केली गेलेली ही भारतासाठी गंभीर चिंतेची बाब आहे आणि एकूण पुष्टी झालेल्या व्यक्तींची संख्या आता ३९ वर पोचली आहे. त्यापैकी बर्‍याच जणांचा प्रवास बाधित देशांतून झालेला आहे. जागतिक पातळीवर आकडा आता एक लाख सात हजारांच्या पुढे गेली आहे.

कोणत्याही क्षेत्रात प्रचलित हवामानाचा विषाणूच्या दीर्घकाळ टिकण्याशी जवळचा संबंध असल्याचे गृहित धरले जाते. असे मानणे आहेत की उबदार वातावरणात अशा प्रकारचे विषाणू जास्त काळ तग धरत नाहीत. उबदार आणि दमट हवामानामुळे विषाणूचा फैलाव होणे कठीण होते. दक्षिण भारत मान्सूनपूर्व परिस्थिती अनुभवत असून तापमान ३० अंशांच्या आसपास आहे जे विषाणूला टिकून राहण्यासाठी घातक मानले जाते. तथापि, आपल्या देशातील उत्तर आणि पूर्वेकडील भाग अजूनही हिवाळ्यापासून वसंत ऋतू कडे आणि पूर्व-मान्सून हंगामाकडे संक्रमण करत आहेत. यास आणखी थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. अवकाळी व वारंवार पावसासह गारपिटीने थंडी वाढविली असून आणि या काळात जास्त पाऊस पडल्यास उद्भवणारी पर्यावरणीय परिस्थिती हानिकारक मानली जाते.

तसेच, हा विषाणू नवीन आहे आणि म्हणूनच, त्याच्या वास्तविक वैशिष्ट्यांमुळे आणि उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये फैलाव थांबण्यासाठी नेमकी परिस्थिती अज्ञात आहे, जरी वाढणार्‍या तापमानामुळे व्हायरसचा प्रसार कमी होत गेला तरी याचा अर्थ असा नाही की ते चांगले होईल. ते नष्ट होईपर्यंत सावध राहण्याची गरज आहे.

कापणीच्या हंगामापर्यंत शेतकर्‍यांना शांत हवामान राहावे असे वाटत असले तरी हवामानातील देवता पुरेसे दयाळू नसल्याचे दिसते. त्यामुळे चांगल्या पिकाच्या आशा धोक्यात आल्या आहेत. उत्तर, पूर्व आणि मध्य भारतातील काही भागांत पुढील दोन आठवड्यांत आणखी काही हवामानाविषयक गतिविधींची अपेक्षा आहे. ज्यामुळे कदाचित अलिकडच्या काळात सर्वाधिक पाऊस असलेला मार्च महिना म्हणून ओळखला जाईल. येत्या ९ मार्चपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात गुजरात, महाराष्ट्र आणि द्वीपकल्पातील बहुतेक भागांमध्ये कमी हवामान गतिविधी दिसून येतील.

उत्तर भारत

मार्चच्या पहिल्या आठवड्यात हरियाणा आणि पंजाब राज्यात आधीच मोठ्या प्रमाणात पावसाचे आधिक्य आहे. पहिल्या आठवड्यात हरियाणामध्ये सरासरीच्या ६५३% आणि पंजाबमध्ये १४०% पाऊस झाला आहे. आता १० मार्च रोजी एक पश्चिमी विक्षोभ येण्याची शक्यता आहे. या हवामान प्रणालीमुळे १० आणि १४ मार्च दरम्यान पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या बर्‍याच भागात गारपिटीसह पाऊस पडेल. १२ आणि १३ तारखेला पंजाब आणि हरियाणा आणि १३ आणि १४ रोजी उत्तर प्रदेशमध्ये गतिविधींची सर्वाधिक तीव्रता राहील. आठवड्याच्या उर्वरित दिवसांत पाऊस हलका व विखुरलेला राहील. तसेच ११ आणि १४ मार्च दरम्यान जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशात डोंगराळ भागांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होईल, या गतिविधींचा जोर १२ आणि १३ रोजी अधिक असेल आणि १४ मार्चला उत्तराखंडकडे सरकतील. या कारणांमुळे या प्रदेशासाठी स्कायमेट ११ आणि १५ मार्च दरम्यान हिमस्खलन होण्याचा इशारा जारी करत असून सतर्क आणि सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत आहे.

पूर्व आणि ईशान्य भारत

या संपूर्ण प्रदेशासाठी ९ आणि १० मार्च रोजी सौम्य आणि तुरळक हवामान गतिविधी अपेक्षित आहेत. तथापि, ११ तारखेनंतर आणि त्यानंतर आठवड्याच्या अखेरपर्यंत गडगडाटासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान १४ मार्च रोजी बिहार, झारखंड, सिक्कीम, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशातील मोठ्या भागात जोरदार व तीव्र गडगडाटी परिस्थितीसह विजांचा कडकडाट व गारपीट संभवत आहे.

मध्य भारत

विदर्भ, पूर्व मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा येथे ९ ते १४ मार्च दरम्यान हलका ते मध्यम पाऊस आणि गडगडाटी परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. १३ आणि १४ मार्च रोजी छत्तीसगड, पूर्व मध्यप्रदेश आणि ओडिशाच्या उत्तरेकडील भागात जोरदार गडगडाट व गारांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुजरात, पश्चिम मध्यप्रदेश, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण या प्रदेशांत संपूर्ण आठवड्यात हवामान कोरडे राहील.

दक्षिण द्वीपकल्प

संपूर्ण प्रदेशात पाऊस आणि गडगडाटी वादळाच्या बाबतीत कोणत्याही महत्त्वपूर्ण हवामान विषयक गतिविधी अपेक्षित नाही. आठवड्याच्या पूर्वार्धात तेलंगाणा, आंध्रप्रदेशचा किनारी भाग, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि तेलंगाणा येथे विखुरलेला व हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. या आठवड्यात रायलसीमा, उत्तर अंतर्गत कर्नाटक आणि तामिळनाडू या भागात दिवसभर कोरडे हवामान राहील. त्यामुळे तामिळनाडूच्या मदुराई, त्रिची, तंजावर, सालेम आणि करूरमधील अंतर्गत भागात आठवड्याच्या उत्तरार्धात ४० अंश सेल्सिअस पर्यंत तापमान वाढू शकेल.

दिल्ली-एनसीआर

दिल्लीत आधीच १५.९ मिमी च्या मासिक सामान्य पावसापेक्षा जवळपास चार पट पाऊस पडला आहे. राजधानी आणि शहराच्या आसपासच्या प्रदेशात १० ते १३ मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस व काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. दिवसाचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २५/२६ अंश आणि १३/१५ अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिरावतील.

चेन्नई

चेन्नईसाठी मार्च हा सर्वात कोरडा महिना आहे. आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता नसल्याने आकाश अंशतः ढगाळ राहून उष्ण आणि दमट परिस्थिती राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५ आणि २५ अंशांच्या आसपास असेल.

तळटीप - मार्चमध्ये दुसर्‍या आठवड्यात व त्यानंतर होणारा पाऊस उत्तर आणि पूर्व भारतातील बहुतेक पिकांसाठी फायदेशीर ठरणार नाही. याउलट, जोरदार वाऱ्यांसह झालेल्या गारपिटीच्या कारणामुळे पिकाचे नुकसान होऊ शकते. येत्या आठवड्यात पावसाची व्याप्ती आणि वारंवारता, उभ्या पिकांचे किती नुकसान होईल हे ठरवेल.

Image Credits – Cambridge in Color 

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try