Skymet weather

[Marathi] 14 जुलै - महाराष्ट्राचा हवामान अंदाज: मुंबई, जळगाव, नाशिक, पुणे येथे पावसाचा जोर वाढला

July 13, 2017 4:38 PM |

 

मान्सूनच्या पावसाने पुन्हा एकदा वेग घेतला असून किनारी भागात तीव्रता वाढलेली दिसत आहे. पुढील चोवीस तासात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून उत्तर कोकणसह उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागात मुसळधार पाउस पडण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पुणे येथे देखील पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात चांगला पाउस अपेक्षित आहे.

विदर्भ आणि मराठवाडा विभागात बऱ्याच भागात गुरुवारी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता असून त्यानंतर शुक्रवारी नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या भागात मुसळधार पाउस होण्याची शक्यता आहे.

[yuzo_related]

गेल्या काही दिवसांपासून बहुतांश ठिकाणी मान्सूनच्या पावसाचे प्रमाण कमी होते पण सध्या पावसाचे प्रमाण सामान्य आहे.

महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता
Rain In Mumbai

सध्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण व गोवा या भागात पावसाची परिस्थिती सामान्य आहे. विदर्भात मात्र पाऊस  सरासरी पेक्षा सत्तावीस  टक्के कमी झाला आहे.

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try