Skymet weather

[Marathi] पश्चिम प्रशांत महासागरातील सुपर टायफून हागीबिस जापानच्या दिशेने

October 10, 2019 4:11 PM |

typhoon hagibis

रविवारी आणि सोमवारी सुपर टायफून हागीबिसने अति-जलद तीव्रतेत वाढीचे विलक्षण दर्शन घडविले आहे, वादळातील वाऱ्यांचा वेग २४ तासांत ताशी १६० किलोमीटरने वाढला असून पृथ्वीतलावर जलदगतीने झालेल्या तीव्रतेतील वाढींपैकी एक आहे.

सुपर टायफून हागीबिसने सोमवारी आणि मंगळवारी गुआम आणि उत्तर मारियाना बेटांना प्रभावित केले आणि आता आपला मोर्चा जपानला कडे वळवला आहे.

ग्वाम येथे पोहचण्यापूर्वी, हागीबिस सुरवातीस अति तीव्र कमीदाबाचे क्षेत्र होते ज्यात ४८ किमी प्रति तास या वेगाने वारे वाहत होते, आणि केवळ ४८ तासांत जलदगतीने तीव्रतेत वाढ होऊन सुपर टायफूनमध्ये रूपांतरित झाले असून सुमारे २४१ किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत.

आता हागीबिस हंगामातील तिसरे वादळ बनले असून वाऱ्यांचा वेग २५७ किमी प्रति तासावर (१६० मैल) पोहोचला आहे. आतापर्यंत चक्रीवादळ डोरियन हे २०१९ मधील सर्वाधिक तीव्रतेचे चक्रीवादळ आहे, ज्यात वारे ताशी २९८ किमी (१८५ मैल) वेगाचे होते.

हागीबिस सध्या श्रेणी-४ चक्रीवादळ आहे. आता, आम्ही आशा करतो की शुक्रवारपासून हागीबिस हळूहळू कमकुवत होईल कारण जपानच्या दक्षिणेकडे पश्चिम प्रशांत महासागरातील खुल्या पाण्यावरून जात आहे.

तीव्रता थोडी कमकुवत होऊन देखील हागीबिस जपानकडे आगेकूच करतांना देखील एक शक्तिशाली चक्रीवादळ म्हणून कायम राहील आणि जीवघेणा परिणाम देण्यास सक्षम असेल. शनिवारी जपानमध्ये श्रेणी ३ चक्रीवादळ म्हणून धडकण्याची शक्यता आहे.

ताज्या पूर्वानुमानुसार, हागीबिस र्युक्यू बेटांच्या पूर्वेकडे पोहोचेल व त्याचा परिणाम उंचसखल समुद्र व जोरदार वारा यांच्यामुळे मर्यादीत होईल.

या बाबतीत जपानची मुख्यभूमी नशीबवान नाही असेच म्हणावे लागेल कारण शनिवार व रविवारच्या आसपास हागीबिस थेट धडकण्याची अपेक्षा आहे.

अचानक पूर, नुकसानकारक वारे, चिखलाचा पूर आणि वाहतुकीत अडथळ्यांपर्यंतच्या संभाव्य धोक्यांच्या दृष्टीने सर्व जापान वासियांनी आता तयार राहावे.

रहिवाशांनी देखील संभाव्य स्थलांतराच्या दृष्टीने तयारी केली पाहिजे तसेच काही ठिकाणी वादळाच्या दरम्यान आणि त्यानंतरच्या विस्तारित कालावधीसाठी वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे.

सध्या पूर्वेकडील शिकोकू, मध्य व पूर्वेकडील होन्शुला यांना सर्वाधिक धोका आहे.

वादळाचा परिणाम टोकियोवर होईल आणि शुक्रवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असून मुख्य परिणाम शनिवारी दुपारी किंवा रात्रीपासून सुरू होईल.

रविवारपासून, जापानमधील बहुतांश भागातील हवामान सुधारण्याची अपेक्षा आहे; तथापि, उत्तर होन्शु आणि पूर्व होक्काइडो येथे मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे कायम राहतील.

Image Credits – Direct relief 

Any information taken from here should be credited to Skymet WeatherFor accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories


latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try

×