Skymet weather

[Marathi] संपूर्ण भारताचा हवामान अंदाज (२७ मे ते २ जून )

May 28, 2019 1:45 PM |

Week forecast

उत्तर भारत

संपूर्ण उत्तर पश्चिम भारतात, हवामान गरम आणि कोरडे राहील. पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थान मध्ये तापमानात वाढ दिसून येईल. उत्तर पश्चिम भागात उष्णतेची लाट परतण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या शेवट पर्यंत राजस्थान आणि हरियाणा मध्ये एक दोन ठिकाणी उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल. तापमान ४५ अंश किंवा त्याच्या वरती नोंदवला जाईल. जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश मध्ये येणाऱ्या आठवड्यात हलका पाऊस अनुभवण्यात येईल.

मध्य भारत

मध्य भारतात, हवामान कोरडे राहील. विदर्भ, मध्य प्रदेश, मराठवाडा आणि राजस्थान मध्ये उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल. तसेच, गुजरात मध्ये देखील तापमानात वाढ दिसून येईल, ज्यामुळे येथे उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल. तथापि, दक्षिण छत्तीसगड मध्ये मे २९ आणि २ जूनच्या मध्ये एक दोन ठिकाणी पाऊस पडू शकतो.

दक्षिण भारत

केरळ मध्ये विखुरलेल्या हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. आंतरिक तामिळनाडू मध्ये २९ मे पासून ते ३१ मे पर्यंत पाऊस पडत राहणे अपेक्षित आहे. आंध्र प्रदेशच्या किनारी भागात आणि रायलसीमा मध्ये २९ आणि ३० मे ला काही ठिकाणी पाऊस पडेल. तेलंगाणा मध्ये एक १ आणि २ जुने ला एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. अंदमान व निकोबार द्वीपसमूहावर पुरत्या आठवड्यात हलक्या ते मध्यम पावसाची नोंद करण्यात येईल.

Also read in English: Weather Forecast for the week in India from May 27 to June 2

पूर्व आणि उत्तर पूर्व भारत

असम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश मध्ये २९ मे पर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडत राहील. उत्तर पूर्व राज्यात काही ठिकाणी पावसाची नोंद करण्यात येईल. ओडिशा मध्ये २८ मे पासून ते ३० मे पर्यंत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पूर्व बिहार आणि झारखंड मध्ये ३० मे पासून पूर्व मॉन्सूनचा पाऊस सुरु होईल. गंगीय पश्चिम बंगाल मध्ये १ आणि २ जुने ला पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बिहार आणि झारखंड मध्ये हवामान कोरडे राहील.

प्रतिमा क्रेडिट्स: पिंटरेस्ट

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे


For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Storieslatest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try